ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
३१ ऑगस्ट २०१५ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल.
शलमोनाच्या प्रार्थनेत यहोवाबद्दलची कोणती सत्यं आपल्याला पाहायला मिळतात? आणि या सत्यांवर मनन केल्यानं आपल्याला काय फायदा होईल? (१ राजे ८:२२-२४, २८) [जुलै ६, टेहळणी बुरूज०५ ७/१ पृष्ठ ३० परि. ३]
दावीद देवासोबत “सरळतेने” चालला यावरून आपण काय शिकू शकतो? (१ राजे ९:४) [जुलै १३, टेहळणी बुरूज१२ ११/१५ पृष्ठ ७ परि. १८-१९]
यहोवानं एलीयाला सारफथच्या विधवेकडं पाठवलं यावरून आपल्याला यहोवाबद्दल कोणती महत्त्वपूर्ण गोष्ट शिकायला मिळते? (१ राजे १७:८-१४) [जुलै २७, टेहळणी बुरूज१४ २/१५ पृष्ठ १४]
आपण १ राजे १७:१०-१६ या अहवालावर मनन केल्यानं यहोवावर भरवसा ठेवण्याचा आपला निश्चय आणखी पक्का कसा होतो? [जुलै २७, टेहळणी बुरूज१४ २/१५ पृष्ठे १३-१५]
एलीयानं निराशेवर मात करण्याच्या बाबतीत मांडलेल्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? (१ राजे १९:४) [ऑग. ३, टेहळणी बुरूज१४ ३/१५ पृष्ठ १५ परि. १५-१८]
यहोवाचा विश्वासू संदेष्टा एलीया हताश झाला होता तेव्हा यहोवानं कशी प्रतिक्रिया दाखवली आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो? (१ राजे १९:७, ८) [ऑग. ३, टेहळणी बुरूज१४ ६/१५ पृष्ठ २७ परि. १५-१६]
अहाबानं कोणता चुकीचा दृष्टिकोन बाळगला आणि आपण तो कसा टाळू शकतो? [ऑग. १०, देवाचे प्रेम पृष्ठे १८८-१८९ वरील चौकट]
अलिशानं एलियाला केलेल्या विनंतीवरून आपण काय शिकू शकतो? आणि राज्याच्या कामात आपल्याला नवीन नेमणूक मिळते तेव्हा याचा कसा फायदा होईल? (२ राजे २:९, १०) [ऑग. १७, टेहळणी बुरूज०३ ११/१ पृष्ठ ३१ परि. ५-६]
लहान मुलं, २ राजे ५:१-३ यात उल्लेख केलेल्या इस्राएली मुलीच्या विश्वासाचं आणि धैर्याचं अनुकरण कसं करू शकतात? [ऑग. २४, टेहळणी बुरूज१२ २/१५ पृष्ठे १२-१३ परि. ११]
या शेवटल्या काळादरम्यान सर्वांनी येहूच्या कोणत्या गुणांचं अनुकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे? (२ राजे १०:१६) [ऑग. ३१, टेहळणी बुरूज११ ११/१५ पृष्ठ ५ परि. ४]