जुलै १३ च्या सप्ताहाचा आराखडा
१३ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ३० आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ६१ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ राजे ९-११ (८ मि.)
क्र. १: १ राजे ९:२४-१०:३ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: देवाच्या वचनातील सल्ला लागू केल्याने चिंता कमी होतात—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. २४ परि. ४–पृ. २५ परि. २ (५ मि.)
क्र. ३: कोरेश—विषय: देवाचा शब्द नेहमी खरा ठरतो—यश ४४:२६–४५:७ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: “तुम्ही जाऊन ... शिष्य करा.”—मत्त. २८:१९, २०.
१३ मि: तुम्ही जाऊन ... शिष्य करा. महिन्याच्या मुख्य विषयावर आधारित भाषण. संपूर्ण महिन्यादरम्यान सेवा सभेत होणाऱ्या भागांची तसंच हे सर्व भाग महिन्याच्या विषयाशी कसे संबंधित आहेत यावर थोडक्यात चर्चा करा.
१७ मि: “शिष्य बनवण्यावर लक्ष केंद्रित करा.” प्रश्न व उत्तरं. बायबल अभ्यास सुरू करण्यात व चालवण्यात निपुण असलेल्या एक किंवा दोन प्रचारकांची थोडक्यात मुलाखत घ्या. त्यांना विचारा: एखाद्याला सत्यात येण्यास मदत करताना तुम्हाला आनंद कसा मिळाला?
गीत १६ आणि प्रार्थना