चांगली कामं करण्यास आवेशानं एकमेकांना उत्तेजन द्या
“प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष” द्या असं इब्री १०:२४ यात म्हटलं आहे. आपलं उदाहरण आणि विश्वास यांद्वारे आपण आपल्या बांधवांना उत्तेजन देऊ शकतो. मंडळीतील बांधवांना तुम्ही तुमचे चांगले अनुभव सांगू शकता. यहोवाची सेवा करत असताना तुम्ही अनुभवत असलेला आनंद त्यांना पाहू द्या. पण त्याचवेळी तुमच्याशी किंवा इतरांशी त्यांची तुलना करण्याचं टाळा. (गलती. ६:४) तुमच्या क्षमतांचा उपयोग बांधवांमध्ये “प्रीती व सत्कर्मे” करण्याचं उत्तेजन देण्यासाठी करा. ‘दोषी भावना उत्पन्न करण्याचं व सत्कर्मे’ करण्याचं उत्तेजन देण्याकरता करू नका. (सेवा स्कूल पुस्तक, पृ. १५८, परि. ४ पाहा.) आपण जर प्रेमानं उत्तेजन दिलं तर ते भौतिक रीत्या इतरांना मदत करून व देवाच्या राज्याविषयी इतरांना सांगून सत्कर्मे करतील.—२ करिंथ. १:२४.