प्रश्न पेटी
◼ आध्यात्मिक प्रौढता प्राप्त करण्यासाठी पालकांनी मुलांना काय शिकवले पाहिजे?
ख्रिस्ती पालक त्यांच्या मुलांना यहोवाच्या “शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतात. (इफिस. ६:४) उदाहरणार्थ, दररोज सकाळी मुलांसोबत दैनिक वचनांची चर्चा केल्याने फायदा होत असल्याचे पालकांना दिसून आले आहे. कौटुंबिक उपासनेच्या आणि इतर वेळी कुटुंबे व्हिडिओ पाहू शकतात आणि त्यांवर चर्चा करू शकतात. तरुणांचे प्रश्न या लेखांमधील खास माहितीवर त्यांच्याशी बोलू शकतात. तसेच, बायबल अहवालांवर आधारित नाटक बसवू शकतात किंवा मुलांसोबत सराव करू शकतात. पण, मुलांना “प्रौढतेप्रत” नेण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पालकांनी त्यांना बायबलमधील गहन सत्येदेखील शिकवली पाहिजेत.—इब्री ६:१, २.
आपण आपल्या क्षेत्रात भेटणाऱ्या लोकांना काय शिकवतो ते विचारात घ्या. पहिल्याच भेटीत किंवा पहिल्याच पुनर्भेटीत आपण सहसा बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा वापर करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करतो. नंतर देवाच्या प्रेमात टिकून राहा हे पुस्तक वापरतो. आपण असे का करतो? कारण बायबल काय शिकवते हे पुस्तक विद्यार्थ्यांना वचनांचे मूलभूत ज्ञान देते. आणि देवाचे प्रेम हे पुस्तक त्यांना, बायबल तत्त्वे दररोजच्या जीवनात कशी लागू करायची ते शिकवते. दोन्ही पुस्तकांचा अभ्यास केल्यामुळे विद्यार्थ्यांना ख्रिस्तात मुळावण्यास आणि “विश्वासात दृढ” होण्यास मदत मिळते. (कलस्सै. २:६, ७) तर मग, या पुस्तकांचा आपल्या मुलांनादेखील फायदा होणार नाही का? त्यांनाही खंडणी, देवाचे राज्य आणि मेलेल्या लोकांची स्थिती यांविषयी शिकवण्याची गरज आहे. देवाने दुःख अजूनपर्यंत का काढून टाकले नाही आणि या व्यवस्थिकरणातील शेवटचे दिवस कसे ओळखायचे हेही त्यांना माहीत झाले पाहिजे. त्यांना याची खातरी पटली पाहिजे की यहोवाचे साक्षीदार जे शिकवतात तेच सत्य आहे. मुलांना बायबल तत्त्वे आणि त्यांच्या “ज्ञानेंद्रियांना” प्रशिक्षित कसे करावे हे समजण्याची गरज आहे. (इब्री ५:१४) अर्थात, पालकांनी त्यांच्या मुलांचे वय आणि त्यांची समजण्याची कुवत लक्षात घेतली पाहिजे. पण, अनेक मुलांमध्ये अगदी लहान वयातच बायबलमधील गहन सत्ये शिकून घेण्याची कुवत असते.—लूक २:४२, ४६, ४७.
पालकांच्या मदतीसाठी आता jw.org या वेबसाईटवर बायबल काय शिकवते यावर आधारित अभ्यास मार्गदर्शक तयार केले जात आहेत. कुटुंबांना आपल्या वेबसाईटवर BIBLE TEACHINGS > TEENAGERS येथे हे पाहायला मिळू शकतील. येणाऱ्या काही दिवसांत देवाचे प्रेम या पुस्तकावर आधारित आणखी अभ्यास मार्गदर्शक तयार करण्यात येतील. अर्थात, छापील स्वरूपातील पुस्तकांचादेखील वापर केला जाऊ शकतो. जसे की, या साहित्याचा वापर संध्याकाळच्या कौटुंबिक उपासनेदरम्यान करायचा की इतर मुलांपैकी एका मुलाचा अभ्यास घेताना करायचा की व्यक्तिगत अभ्यास कसा करावा याचे मुलाला प्रशिक्षण देताना करायचा हे पालक ठरवू शकतात.