मे १२ च्या सप्ताहाचा आराखडा
१२ मे पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ४५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबलचा संदेश अध्या. २३ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: निर्गम २७-२९ (१० मि.)
क्र. १: निर्गम २९:१९-३० (४ मि. किंवा कमी)
क्र. २: येशूला वधस्तंभावर निंदा करण्यासाठी टांगले—बायबल विषय ३क (५ मि.)
क्र. ३: अब्राहाम—आज्ञापालन, निःस्वार्थीपणा व धैर्य हे गुण यहोवाला संतुष्ट करतात—उत्प ११:३२; १२:६–१३:१८; १४:१-२०; निर्ग १२:४०-४३; गल ३:१७ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील. (यश. २:२) दोन प्रचारकांची मुलाखत घ्या; त्यांपैकी एक खूप वर्षांपासून सत्यात आहे आणि दुसरा नवीन आहे. कोणत्या गोष्टीमुळे ते सत्याकडे आकर्षित झाले? त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? पहिल्यांदा मंडळीच्या सभेला उपस्थित राहिल्यावर कोणती गोष्ट त्यांना भावली? पहिल्यांदा सेवेत गेल्यावर आलेल्या अनुभवांपैकी कोणती गोष्ट त्यांना आठवते? आध्यात्मिक प्रगती करत राहण्यास मंडळीतील इतरांनी त्यांना कशी मदत केली?
१५ मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—सुरुवातीचे शब्द बोलण्याची तयारी करा.” चर्चा. दोन भागांचे प्रात्यक्षिक दाखवा. पहिल्या भागात सुरुवातीचे शब्द बोलण्याची चांगली तयारी करण्यात आली नाही आणि दुसऱ्या भागात चांगली तयारी करण्यात आली आहे, हे दाखवा. वेळेनुसार, सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठे २१५ ते २१९ यांतील समर्पक मुद्दे निवडा.
गीत २० आणि प्रार्थना