घोषणा
◼ साहित्य सादरता एप्रिल: टेहळणी बुरूज नियतकालिक. पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. मे आणि जून: बायबल नेमके काय शिकवते? किंवा खालीलपैकी कोणतीही पत्रिका: तुमचे नशीब आधीच ठरलेले आहे का?, यहोवा—कोण आहे?, दुःखाचा कधी अंत होईल का? आणि जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? घरमालकाने आवड दाखवल्यास बायबल काय शिकवते पुस्तकाचा वापर करून किंवा देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांपैकी एकाचा वापर करून बायबल अभ्यास कसा चालवला जातो ते दाखवा. जुलै: देवाकडून आनंदाची बातमी! किंवा बायबल मानवजातीला कोणता संदेश देते? हे ३२ पानी माहितीपत्रक सादर करा. पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करून किंवा घरमालकाची क्षमता विचारात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांपैकी एकाचा वापर करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.