एप्रिल २१ च्या सप्ताहाचा आराखडा
२१ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ८ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबलचा संदेश अध्या. २० (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: निर्गम १५-१८ (१० मि.)
क्र. १: निर्गम १५:२०–१६:५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: सृष्टी—सिद्ध झालेल्या विज्ञानाशी सुसंगत; उत्क्रांतिवादाचे खंडन करते—बायबल विषय ४१क (५ मि.)
क्र. ३: गर्भपात—जीवन देवाकडून मिळालेली मौल्यवान देणगी आहे (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: तुमच्यासाठी जे अतोनात श्रम घेतात. (१ थेस्सलनी. ५:१२, १३) दोन वडिलांची मुलाखत घ्या. त्यांच्यावर मंडळीत कोणत्या जबाबदाऱ्या आहेत? आणखी कोणत्या ईश्वरशासित जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत? इतर जबाबदाऱ्या सांभाळत असताना ते या जबाबदाऱ्या कसे सांभाळतात? ते सेवाकार्याला पहिले स्थान कसे देतात? कुटुंबातील सदस्यांकडून त्यांना पाठिंबा कसा मिळतो?
१५ मि: नवीन शालेय वर्षासाठी कशी तयारी करावी? श्रोत्यांसोबत चर्चा. मुलांना शाळेत कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे श्रोत्यांना विचारा. आपल्या मुलांना प्रलोभनांचा सामना करता यावा व आपल्या विश्वासाबद्दल इतरांना सांगता यावे म्हणून आईवडील कौटुंबिक उपासनेत संशोधन मार्गदर्शक, तरुणांचे प्रश्न आणि अशा इतर प्रकाशनांचा कसा उपयोग करू शकतात हे स्पष्ट करा. (१ पेत्र ३:१५) एक किंवा दोन विषय निवडा आणि फायदेकारक ठरू शकेल अशी माहिती आपल्या प्रकाशनांतून सांगा. शाळेत असताना त्यांनी कशा प्रकारे साक्ष दिली हे श्रोत्यांना विचारा.
गीत ५१ आणि प्रार्थना