ऑक्टोबर १४ च्या सप्ताहाचा आराखडा
१४ ऑक्टोबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ४८ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १७ परि. ९-१५ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: फिलिप्पैकर १-कलस्सैकर ४ (१० मि.)
क्र. १: फिलिप्पैकर ३:१७–४:९ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: एक धाडसी माणूस—बायबल कथा ७ (५ मि.)
क्र. ३: प्रलोभनांचा प्रतिकार करण्यासाठी प्रार्थना आपल्याला कशी मदत करू शकते?—लूक ११:९-१३; याको. १:५ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: आपल्या आंतरराष्ट्रीय एकतेमुळे यहोवाचा सन्मान होतो. आपली राज्य सेवा सप्टेंबर २००७ पुरवणी पृष्ठ ४ वरील परिच्छेद २ ते पृष्ठ ६ वरील पोटमथळ्यापर्यंतच्या माहितीवर किंवा यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित पुस्तकातील पृष्ठ १६५ वरील परिच्छेद २ ते पृष्ठ १६८ वरील पोटमथळ्यापर्यंतच्या माहितीवर आधारित चर्चा. यहोवाच्या साक्षीदारांमधील एकता व प्रेम पाहून लोकांना साक्ष कशी मिळाली याबद्दल आपल्या प्रकाशनांत दिलेले अनुभव श्रोत्यांमधील काहींना विचारा.
१५ मि: “समजबुद्धीने सुवार्ता सांगा.” प्रश्न व उत्तरे. परिच्छेद ३ वर चर्चा केल्यानंतर, घरमालकाची परिस्थिती लक्षात घेऊन आपण आपल्या सादरीकरणात फेरबदल कसे करू शकतो याची दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा. हा मुद्दा स्पष्ट झाल्यानंतर प्रात्यक्षिके थांबवली जाऊ शकतात, मग ती सुरुवातीला असोत किंवा प्रात्यक्षिकांच्या मधे असोत.
गीत ४७ आणि प्रार्थना