तरुणांनो—तुम्ही काही आध्यात्मिक ध्येये ठेवली आहेत का?
१ आनंदी राहण्यासाठी अर्थपूर्ण काम आणि साध्य होण्याजोगी ध्येये ठेवणे किती महत्त्वाचे हे यहोवाला माहीत आहे. (उत्पत्ति १:२८; २:१५, १९ पाहा.) आज यहोवाने त्याच्या लोकांना प्रचार कार्य करण्याची आणि शिकवण्याची नेमणूक दिली आहे. आपल्यासमोरही सार्वकालिक जीवन मिळवण्याचे एक ध्येय आहे. पण तोपर्यंत, आपल्या शक्तीचा आणि साधनसंपत्तीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून प्रगतीशील आध्यात्मिक ध्येये ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.—१ करिंथ. ९:२६.
२ तरुण पूर्ण करू शकतील अशी ध्येये: तरुणांनी त्यांच्या योग्यतेनुसार ते पूर्ण करू शकतील अशी आध्यात्मिक ध्येये ठेवली पाहिजेत. (१ तीम. ४:१५) काही लहानग्यांनी वाचायला शिकण्याआधीच बायबल पुस्तकांची नावे तोंडपाठ करण्याचे ध्येय गाठले आहे. मुले कौटुंबिक उपासनेदरम्यान सभांची तयारी कशी केली पाहिजे हे शिकतात तेव्हा संभामध्ये चांगली उत्तरे देण्याचे आणि ईश्वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदवण्याचे ध्येय गाठू शकतात. मुले जेव्हा आपल्या आईवडिलांसोबत क्षेत्र सेवेत जातात तेव्हा ते साक्ष देण्यास शिकतात आणि बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक बनण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रगती करू शकतात. पालकांनी त्यांच्या मुलांसमोर समर्पण करण्याचे आणि बाप्तिस्मा घेण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.
३ कोवळ्या वयापासूनच येशूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. तो फक्त १२ वर्षांचा होता तेव्हापासून आध्यात्मिक गोष्टींविषयी अगदी सहजपणे बोलायचा. (लूक २:४२-४९, ५२) वैयक्तिक अभ्यास करणे, नियमित बायबल वाचन करणे, प्रौढ ख्रिस्ती बंधुभगिनींबरोबर मंडळीत आणि क्षेत्र सेवेत सहवास राखणे यांसारखी फायदेकारक ध्येये ठेवल्याने तुम्ही देवाच्या राज्याबद्दल इतरांना सांगण्यात येशूप्रमाणेच कुशल होऊ शकाल.