घोषणा
◼ साहित्य सादरता जुलै आणि ऑगस्ट: खालीलपैकी कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक द्या: समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, देवाकडून आनंदाची बातमी!, बायबल मानवजातीला कोणता संदेश देते? आणि जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करा व बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. सप्टेंबर आणि ऑक्टोबर: पुढील एखाद्या पत्रिकेचा उपयोग करा: सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार!, कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा, शांतीदायक नवीन जगातील जीवन, जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो?, दुःखाचा कधी अंत होईल का? आणि जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? घरमालकाला आवड असल्यास बायबल काय शिकवते किंवा देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा घेतला जातो हे दाखवा.