घोषणा
◼ साहित्य सादरता डिसेंबर: पुढील एखाद्या पत्रिकेचा उपयोग करा: सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार!, खिन्न झालेल्यांना सांत्वन, कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा, तुमचे नशीब आधीच ठरलेले आहे का?, शांतीदायक नवीन जगातील जीवन आणि मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? घरमालकाला आस्था असल्यास बायबल काय शिकवते या पुस्तकाचा किंवा देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा केला जातो हे दाखवा. जानेवारी आणि फेब्रुवारी: पुढील ३२ पानांचे कोणतेही एखादे माहितीपत्रक सादर करा. समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, यहोवाचे साक्षीदार—ते कोण आहेत? त्यांचा काय विश्वास आहे? बायबल मानवजातीला कोणता संदेश देते? आणि जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करू शकता, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेता देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करू शकता. मार्च आणि एप्रिल: टेहळणी बुरूज नियतकालिक. पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करू शकता, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करू शकता.
◼ २०१४ सालचा स्मारक विधी सोमवार, १४ एप्रिल रोजी होणार आहे.
◼ मार्च २०१३ मध्ये साहाय्यक पायनियरींग करू इच्छिणाऱ्या प्रचारकांपुढे ३० किंवा ५० तास भरण्याचा पर्याय असेल. तसेच मार्च महिन्यादरम्यान जर एखाद्या मंडळीत विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल तर, सर्व साहाय्यक पायनियरांना सामान्य पायनियरांबरोबर होणाऱ्या विभागीय पर्यवेक्षकांच्या संपूर्ण सभेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले जाते.