संध्याकाळच्या साक्षकार्यात तुम्ही सहभाग घेऊ शकाल का?
१. एका पुस्तकानुसार पौल घरोघरचे सेवाकार्य कोणत्या वेळी करायचा?
१ पौल घरोघरच्या सेवाकार्यात नेमका किती वेळ घालवत असे याबद्दल डेली लाईफ इन बायबल टाईम्स या पुस्तकात असे म्हटले आहे की तो “संध्याकाळी ४ पासून रात्री उशिरापर्यंत” सेवाकार्य करायचा. पौल याच वेळेला सेवाकार्य करायचा किंवा नाही हे आपल्याला निश्चितपणे माहीत नसले तरी, तो “सर्व काही सुवार्तेकरता” करायचा एवढे मात्र आपल्याला माहीत आहे. (१ करिंथ. ९:१९-२३) त्याला जास्तीत जास्त लोकांबरोबर बोलण्याची संधी मिळायची तेव्हा तो घरोघरचे सेवाकार्य करायचा.
२. साक्षकार्य करण्यासाठी संध्याकाळची वेळ उत्तम का आहे?
२ बऱ्याच ठिकाणचे प्रचारक आठवड्यादरम्यान घरोघरचे साक्षकार्य सहसा सकाळी करतात. पण, तुमच्या ठिकाणी आताही सेवाकार्यासाठी सकाळची वेळ उत्तम आहे का? एक पायनियर त्याच्या क्षेत्राबद्दल सांगतो: “दिवसा क्वचितच लोक भेटतात. पण जास्तीत जास्त लोक संध्याकाळी घरी भेटतात.” संध्याकाळच्या किंवा दुपारच्या साक्षकार्यामुळे पुरुषांना भेटण्याची उत्तम संधी मिळू शकते. अशा वेळी, घरमालक सहसा निवांत आणि संभाषण करण्यास तयार असतात. संध्याकाळचे साक्षकार्य जर फायद्याचे असेल तर मंडळीचे वडील क्षेत्र सेवेची सभा संध्याकाळी घेऊ शकतात.
३. संध्याकाळचे साक्षकार्य करताना आपण समंजसपणा कसा दाखवू शकतो?
३ समंजसपणा दाखवा: संध्याकाळचे साक्षकार्य करताना समंजसपणा दाखवणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जर चुकीच्या वेळी घरमालकाला भेटायला गेलात, जसे की त्याच्या जेवणाच्या वेळी गेलात तर त्याच्याकडे नंतर येऊ असे तुम्ही त्याला सांगू शकता. जर अंधार आहे तर, घरमालक तुम्हाला पाहू शकेल अशा ठिकाणी उभे राहा. त्वरित तुमची ओळख सांगा आणि तुमच्या येण्याचे कारण सांगा. सेवाकार्यात दोघेदोघे कार्य करणे किंवा क्षेत्र सेवेचा गट जवळपासच कार्य करत असणे चांगले राहील. आणि रस्त्यावर दिव्यांचा भरपूर प्रकाश आहे अशा ठिकाणी कार्य करा. घरमालकाला भेटण्यासाठी रात्री उशिरा जाऊ नका कारण ती कदाचित त्यांची झोपायची वेळ असेल. (२ करिंथ. ६:३) एखाद्या क्षेत्रात अंधार पडल्यावर जाणे असुरक्षित असेल तर तेथे संध्याकाळी उजेड आहे तोपर्यंत साक्षकार्य करणे उचित ठरेल.—नीति. २२:३.
४. संध्याकाळचे साक्षकार्य केल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?
४ आशीर्वाद: आपल्याला जेव्हा सुवार्ता सांगण्याची संधी मिळते तेव्हा आपण साक्षकार्यात आनंद अनुभवतो. सुवार्ता सांगण्याच्या आपल्याला जितक्या जास्त संधी मिळतील तितक्या जास्त लोकांचे “तारण” होण्यासाठी आणि त्यांना सत्याचे अचूक ज्ञान घेण्यासाठी आपण मदत करू शकतो. (१ तीम. २:३, ४) संध्याकाळच्या साक्षकार्यात सहभागी होण्यासाठी तुम्ही तुमच्या दिनक्रमात काही फेरबदल करू शकता का?