वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/१२ पृ. २
  • आपल्या मनाचे रक्षण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या मनाचे रक्षण करा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यास मदत करणारे विभागीय संमेलन
    आमची राज्य सेवा—२००९
  • आपल्या विवेकाचे रक्षण करा
    आमची राज्य सेवा—२०१२
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९५
  • देवाच्या सेवकांसाठी एक तरतूद
    आमची राज्य सेवा—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ८/१२ पृ. २

आपल्या मनाचे रक्षण करा

१. २०१३ सेवा वर्षाच्या विभागीय संमेलनाचा विषय काय आहे, आणि या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे?

१ येशूने त्याच्या अनुयायांना यहोवाची पूर्ण अंतःकरणाने, जिवाने व मनाने सेवा करण्याची आज्ञा दिली होती. (मत्त. २२:३७, ३८) या वर्षाचे प्रांतीय अधिवेशन आणि संमेलने आपल्याला आपले आंतरिक व्यक्‍तिमत्त्व बळकट करण्यास मदत मिळावी या हेतूने तयार करण्यात आली आहेत. तुम्हाला माहीत असेल की येत्या प्रांतीय अधिवेशनाचा विषय आहे “आपल्या अंतःकरणाचे रक्षण करा!” आणि २०१३ सेवा वर्षाच्या खास संमेलन दिनाचा विषय आहे “आपल्या विवेकाचे रक्षण करा.” त्याचप्रमाणे या सेवा वर्षातील विभागीय संमेलनाचा विषयही आपल्या आंतरिक व्यक्‍तिमत्त्वाशी संबंधित असून त्याचा विषय आहे, “आपल्या मनाचे रक्षण करा” जो मत्तय २२:३७ या वचनावर आधारित आहे. या कार्यक्रमामुळे, आपल्याला आपल्या विचारांचे परीक्षण करण्यास मदत मिळेल जेणेकरून आपल्याकडून होता होईल तितके आपण यहोवाला आनंदी करू शकू.

२. कार्यक्रमादरम्यान आपल्याला कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील?

२ कोणती माहिती सादर केली जाईल? या कार्यक्रमात जे भाग सादर केले जातील त्यातून आपल्याला पुढील प्रश्‍नांची उत्तरे मिळतील; तेच या कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे आहेत:

• आपण ‘इतरांसारखा विचार’ करण्याचे कसे टाळू शकतो?

• जे सत्यात नाहीत त्यांना आपण आध्यात्मिक अंधारातून प्रकाशात येण्यास कशी मदत करू शकतो?

• आपण कोणती मनोवृत्ती विकसित केली पाहिजे?

• योग्य रीत्या मनन केल्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो?

• आपल्या विचारसरणीला आकार देण्यासाठी यहोवा जी मदत पुरवतो ती आपण कशी स्वीकारू शकतो?

• कुटुंब सुखी करण्यासाठी पती, पत्नी, पालक, आणि मुले कसा हातभार लावू शकतात?

• यहोवाच्या दिवसासाठी आपण तयारीत कसे राहू शकतो?

• सेवाकार्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी कशी करू शकतो?

• आपण जे शिकतो त्याचा जीवनात अवलंब केल्याने आपल्याला काय आशीर्वाद मिळू शकतात?

३. दोन्ही दिवस संमेलनाला उपस्थित राहणे, कार्यक्रम लक्ष देऊन ऐकणे आणि शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करणे इतके महत्त्वाचे का आहे?

३ सैतान आपली मने दूषित करण्याचा होता होईल तितका प्रयत्न करत आहे. (२ करिंथ. ११:३) त्यामुळे आपण आपल्या विचारांना काबूत ठेवून आपल्या मनाचे रक्षण केले पाहिजे. आपण सतत ख्रिस्ताचे मन प्रतिबिंबित करण्याची आणि या अधार्मिक जगातून येणाऱ्‍या प्रभावांचा प्रतिकार करण्यास संघर्ष करण्याची गरज आहे. (१ करिंथ. २:१६) तेव्हा, संमेलनाच्या दोन्ही दिवशी आवर्जून उपस्थित राहा. कार्यक्रम लक्ष देऊन ऐका. कार्यक्रमादरम्यान दिल्या जाणाऱ्‍या महत्त्वाच्या माहितीमुळे सेवाकार्यात आवेशाने सहभाग घेण्यासाठी आपल्या मनाची तयारी करण्यास आपल्याला मदत मिळू शकते.—१ पेत्र १:१३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा