वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१२ पृ. ३
  • कवडीमोलाची एक दमडी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कवडीमोलाची एक दमडी
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • इतरांपेक्षा तिने जास्त टाकले
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • यहोवा तुमच्या जिवाभावाच्या सेवेची प्रशंसा करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • अनुदान केल्याने आनंद मिळतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • ‘अनीतीकारक धनाने मित्र जोडा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ४/१२ पृ. ३

कवडीमोलाची एक दमडी

संपूर्ण जगभर चाललेल्या प्रचार कार्याला आर्थिक मदत देऊन आपण एका महत्त्वाच्या मार्गाने देवाच्या राज्याला आपला पाठिंबा आहे हे दर्शवतो. पण आपल्यालाच जर आर्थिक चणचण जाणवत असेल तर काय?

येशूने एकदा एका गरीब विधवेला मंदिराच्या दानपेटीत दोन टोल्या म्हणजे एक दमडी टाकताना पाहिले. या दोन टोल्यांची तशी पाहता जास्त किंमत नव्हती. पण यहोवावर तिचे प्रेम होते म्हणून ती “आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका” टाकण्यास प्रवृत्त झाली होती. (मार्क १२:४१-४४) येशूने या गरीब विधवेची दखल घेतली यावरूनच सिद्ध होते, की तिने टाकलेली देणगी देवाच्या नजरेत अत्यंत मोलाची होती. तसेच, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी कधी असा विचार केला नाही, की सेवेसाठी होणारा खर्च उचलण्याची जबाबदारी फक्‍त श्रीमंत बंधुभगिनींचीच आहे. प्रेषित पौलाने मासेदोनियाच्या मंडळीचा उल्लेख केला. या मंडळीतील बंधुभगिनींचे “कमालीचे दारिद्र्‌य” असतानाही त्यांनी “पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी,” असे “आग्रहपूर्वक मागितले.”—२ करिंथ. ८:१-४.

तेव्हा, आपण जरी त्या विधवेप्रमाणे फक्‍त “एक दमडी” टाकू शकत असलो, तरी थेंबा थेंबानेच तळे साचते हे आपण विसरता कामा नये. आपण दानपेट्यांत जी देणगी टाकतो ती पूर्ण मनाने टाकली तर आपला उदार स्वर्गीय पिता संतुष्ट होईल. कारण “संतोषाने देणारा देवाला प्रिय” आहे.—२ करिंथ. ९:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा