एप्रिल ९ च्या सप्ताहाचा आराखडा
९ एप्रिलने सुरू होणारा सप्ताह
गीत १२ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ८९, ९० (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यिर्मया २२-२४ (१० मि.)
क्र. १: यिर्मया २३:१५-२३ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: नव्या जगात जीवन कधीही कंटाळवाणे का वाटणार नाही? (५ मि.)
क्र. ३: पत्नी ख्रिस्ती नसल्यास शांती कशी राखावी?—कुटुंब पृ. १३२ परि. १०, ११ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: तुमच्या सेवेकडे लक्ष द्या. टेहळणी बुरूज, १५ जानेवारी २००८, पृष्ठे ६-८, परि. १४-१९ यांतील माहितीवर आधारित भाषण. शाखा कार्यालयाची अनुमती घेतल्यावर वडील जन मंडळीला जवळपासच्या अशा क्षेत्रांबद्दल माहिती देऊ शकतात जेथे सेवाकार्य करण्यात आलेले नाही आणि जेथे सुट्यांमध्ये काही जणांच्या गटांनी किंवा कुटुंबांनी साक्षकार्य करायला जाणे सुरक्षित राहील. अशा प्रकारचे साक्षकार्य करताना वडिलांनी व्यवस्थित नियोजन व देखरेख करणे गरजेचे आहे. प्रचारक आपल्या योजनांविषयी वडिलांसोबत चर्चा करू शकतात. जवळपासच्या एखाद्या मंडळीला अथवा गटाला त्यांचे क्षेत्र पूर्ण करण्यासाठी साहाय्याची गरज असल्यास, उन्हाळ्याच्या सुट्यांदरम्यान मंडळीने त्यांच्यासोबत सेवाकार्य करण्याची योजना वडील जन आखू शकतात. यासंबंधीची माहिती मिळवण्याकरता तुम्ही तुमच्या विभागीय पर्यवेक्षकांशी संपर्क करू शकता.
१५ मि: “शिकवण्याची कला सुधारण्याचे तीन मंत्र.” प्रश्न व उत्तरे. परिच्छेद २ वर चर्चा करताना एक प्रात्यक्षिक दाखवा. एक प्रचारक घरमालकाबरोबर बायबल काय शिकवते पुस्तकाच्या पृष्ठ ३ वरील पहिल्या परिच्छेदाची चर्चा करतो. ईयोब १०:१५ वाचल्यानंतर, ईयोब कोण होता, हे प्रचारक एक-दोन मिनिटांत सांगतो. त्यानंतर, श्रोत्यांना विचारा: प्रात्यक्षिकात पाहिल्यानुसार प्रचारकाने ईयोबाबद्दल दिलेली माहिती अचूक होती, तरी शिकवण्याची ही पद्धत बरोबर का नव्हती?
गीत १० आणि प्रार्थना