वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/१२ पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०१२
आमची राज्य सेवा—२०१२
km २/१२ पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

२७ फेब्रुवारी २०१२ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रत्येक मुद्द्‌यावर कधी चर्चा केली जाईल त्याची तारीख देण्यात आली आहे. यामुळे दर आठवडी प्रशालेची तयारी करताना तुम्हाला त्यावर संशोधन करता येईल.

१. यहोवाची दया त्याच्या न्यायाची तीव्रता कमी करते, असे म्हणणे बरोबर आहे का? (यश. ३०:१८) [जाने. ९, टेहळणी बुरूज०२ ३/१ पृ. ३०]

२. हिज्कियाचा कारभारी, शेबना याला त्याच्या हुद्द्‌यावरून काढून टाकण्यात आले त्यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? (यश. ३६:२, ३, २२) [जाने. १६, टेहळणी बुरूज०७ २/१ पृ. ८ परि. ६]

३. यशया ३७:१, १४-२० मधील अहवालातून आपण दुःखद प्रसंगाला सामोरे जाण्याविषयी काय शिकतो? [जाने. १६, टेहळणी बुरूज०७ २/१ पृ. ९ परि. १]

४. यशया ४०:३१ मधील उदाहरणावरून यहोवाच्या सेवकांना उत्तेजन कसे मिळते? [जाने. २३, टेहळणी बुरूज९६ ६/१५ पृ. १०-११]

५. यशया ४१:१०, १३ मध्ये आपल्याला कोणते प्रेमळ आश्‍वासन देण्यात आले आहे? [जाने. २३, टेहळणी बुरूज०६ १०/१ पृ. ३१ परि. १८, १९]

६. यशया ४९:१५ वचनातून आपण यहोवाच्या दयेविषयी काय शिकतो? [फेब्रु. ६, टेहळणी बुरूज०७ १०/१ पृ. ९ परि. ४]

७. “विदेशी” कोण आहेत आणि ते कशा प्रकारे यहोवाचा “करार दृढ धरून राहतात”? (यश. ५६:६) [फेब्रु. १३, टेहळणी बुरूज०७ २/१ पृ. १० परि. ३]

८. यशया ६०:१७ येथे वर्णन केल्याप्रमाणे, यहोवाच्या लोकांनी शेवटल्या दिवसांत काय अनुभवले आहे? [फेब्रु. २०, टेहळणी बुरूज०६ ३/१ पृ. १७ परि. ३]

९. ‘भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी’ या वाक्यांशावरून राज्याच्या संदेशाविषयी काय सूचित होते? (यश. ६१:१, २) [फेब्रु. २०, टेहळणी बुरूज०५ ७/१ पृ. २१ परि. १४]

१०. यशया ६३:९ मध्ये यहोवाच्या कोणत्या सुरेख गुणाबद्दल सांगितलेले आहे? [फेब्रु. २७, टेहळणी बुरूज०३ ७/१ पृ. १९ परि. २२-२३]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा