फेब्रुवारी १३ च्या सप्ताहाचा आराखडा
१३ फेब्रुवारीने सुरू होणारा सप्ताह
गीत ४९ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ७६, ७७ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यशया ५२-५७ (१० मि.)
क्र. १: यशया ५६:१-१२ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: एकनिष्ठेविषयी पेत्राच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?—योहान ६:६८, ६९ (५ मि.)
क्र. ३: कुटुंबातील सदस्य आजारी असतो तेव्हा प्राथमिकता मांडणे—कुटुंब पृ. १२२ परि. १४, १५ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: शिकवण्याच्या कलेत कुशल बना—भाग १. सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठ ५६ परिच्छेद १ ते पृष्ठ ५७ परिच्छेद २ वर आधारित भाषण.
१० मि: प्रचार करण्याचे जे ‘सोडत नाहीत’ त्यांच्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद. टेहळणी बुरूज, १५ जानेवारी २००८, पृष्ठे १४-१६, परिच्छेद १०-१६ वर आधारित चर्चा. यांतून कोणते धडे शिकायला मिळाले, ते श्रोत्यांना विचारा.
१० मि: “सेवा वाढवण्याची आत्तापासूनच योजना करा.” प्रश्न व उत्तरे. परिच्छेद ३ वर चर्चा करताना, मार्च, एप्रिल व मे महिन्यांसाठी क्षेत्र सेवेच्या कोणत्या योजना केल्या आहेत त्याविषयी सेवा पर्यवेक्षकांना विचारा.
गीत १६ आणि प्रार्थना