नोव्हेंबर १४ च्या सप्ताहाचा आराखडा
१४ नोव्हेंबर ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३२ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ५०, ५१ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: उपदेशक १-६ (१० मि.)
क्र. १: उपदेशक ६:१-१२ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: तुमच्या मुलांचे मित्र—कुटुंब पृष्ठे ९५-९७ परि. १४-१८ (५ मि.)
क्र. ३: खरे ख्रिस्ती रोमकर १२:१९ मधील सल्ल्याचे पालन का करतात? (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: ‘बांधवांच्या मदतीसाठी हातभार लावण्याच्या बहुमानाचा’ तुम्हाला आनंद होतो का? १५ नोव्हेंबर २०११ च्या टेहळणी बुरूज, पृष्ठे २२-२३ वरील माहितीवर आधारित भाषण.
१५ मि: “बी वाढण्यासाठी पाणी घालण्याची गरज आहे.” प्रश्न व उत्तरे. तिसऱ्या परिच्छेदावर चर्चा केल्यानंतर, एक प्रचारक पुनर्भेटीची तयारी कशी करतो असे स्वगत अर्थात स्वतःशी बोलत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा. मागील भेटीदरम्यान आस्थेवाईक व्यक्तीविषयी जे काही टिपण लिहून घेतले होते ते तो पाहतो आणि त्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाला कसे उत्तर देता येईल व बायबल काय शिकवते या पुस्तकातून अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो यावर विचार करतो. पुनर्भेट कशी मोजली जाते यावर थोडक्यात उजळणी करण्याकरता डिसेंबर २००६ च्या आमची राज्य सेवा पुरवणीच्या पृष्ठ ७ वरील ‘तुमचा वैयक्तिक क्षेत्र सेवा अहवाल’ या पोटमथळ्याखालील परिच्छेद ३ पाहा.
गीत ४४ आणि प्रार्थना