वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/११ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२०११
  • मिळती जुळती माहिती
  • प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
    आमची राज्य सेवा—२००५
  • दारात उभे राहून व टेलिफोनवरून प्रगतीशील बायबल अभ्यास घेणे
    आमची राज्य सेवा—२००६
  • ‘ह्‍या प्रकारे तुम्ही प्रार्थना करा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • निरंतर प्रार्थना का केली पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०११
km ९/११ पृ. ३

प्रश्‍न पेटी

▪ दारात उभे राहून बायबल अभ्यास घेताना प्रार्थना करावी का?

बायबल अभ्यासाच्या आधी आणि नंतर प्रार्थना करण्यात बरेच फायदे आहेत. आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण, यहोवाला आपल्या चर्चेवर त्याच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन द्यावे अशी विनंती करत असतो. (लूक ११:१३) प्रार्थना केल्याने आपल्या बायबल विद्यार्थ्यालाही त्याच्या बायबल अभ्यासाचे गांभीर्य कळते आणि तोही प्रार्थना करायला शिकतो. (लूक ६:४०) त्यामुळे अभ्यासाच्या आधी शक्यतो प्रार्थना करावीच. पण सर्वच परिस्थितींमध्ये हे शक्य नसते. जसे की काही बायबल अभ्यास, दारात उभे राहूनच घ्यावे लागतात. अशा वेळी प्रार्थना करायची किंवा नाही, हे बायबल अभ्यास घेणाऱ्‍याने परिस्थिती पाहून ठरवावे.

एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्याचा आपण विचार करू शकतो. ती म्हणजे, दारात उभे राहून अभ्यास होत असेल आणि लोकांची वर्दळ कमी असेल तर, अभ्यासाच्या सुरुवातीला व नंतर एक लहानशी प्रार्थना करायला काही हरकत नाही. पण, लोकांची वर्दळ असेल, येणाऱ्‍या-जाणाऱ्‍यांचे विनाकारण लक्ष आकर्षित होत असेल, किंवा बायबल विद्यार्थ्याला स्वतःलाच जर संकोच वाटत असेल तर, जोपर्यंत तुम्हाला अभ्यासासाठी योग्य ठिकाण मिळत नाही तोपर्यंत प्रार्थना न करणे उचित ठरू शकेल. तरीपण, अभ्यास कोठेही होत असला तरी, प्रार्थनेने अभ्यास केव्हा सुरू करायचा हे आपण विचारपूर्वक ठरवावे.—आमची राज्य सेवा मार्च २००५, पृष्ठ ८ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा