“कनवाळू” असा
१. आज लोकांना कशाची नितांत गरज आहे?
१ संपूर्ण इतिहासात कनवाळूपणाच्या साहाय्याची गरज, अनेकांना यापूर्वी कधीही भासली नव्हती. अधिकाधिक वाईट होत चाललेल्या या जगाच्या परिस्थितीमुळे पुष्कळ लोक दुःखी, निराश व आशाहीन झाले आहेत. हजारो लोकांना मदतीची गरज आहे. आपण यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे इतर लोकांप्रती खरी काळजी दाखवू शकतो. (मत्त. २२:३९; गलती. ६:१०) अशी काळजी आपण कशी दाखवू शकतो?
२. सहानुभूती दाखवण्याचा आपल्याकडे एक उत्तम मार्ग कोणता आहे?
२ कनवाळूपणा दाखवण्याचे कार्य: आपल्याला फक्त देवाकडूनच खरे आणि कायमचे सांत्वन मिळते. (२ करिंथ. १:३, ४) यहोवा आपल्याला ‘कनवाळूपणा’ दाखवण्याच्या बाबतीत त्याचे अनुकरण करण्याचा आग्रह करतो आणि त्याने आपल्यावर इतरांना राज्य संदेशाची सुवार्ता सांगण्याचे काम सोपवले आहे. (१ पेत्र ३:८) या कामात आवेशाने सहभागी होणे हा “भग्न हृदयी” लोकांना सांत्वन देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, कारण फक्त देवाचे राज्यच दुःखी लोकांसाठी खरी आशा देते. (यश. ६१:१) लवकरच, यहोवा दुष्टाईला काढून धार्मिकतेचे नवीन जग आणण्याकरता कार्य करून आपल्या लोकांना कनवाळूपणा दाखवणार आहे.—२ पेत्र ३:१३.
३. आपण लोकांप्रती येशूसारखा दृष्टिकोन कसा बाळगू शकतो?
३ लोकांप्रती येशूसारखा दृष्टिकोन बाळगा: मोठ्या संख्येत असणाऱ्या लोकांना प्रचार करताना येशूने लोकांना केवळ एक समूह या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले नाही तर प्रत्येक व्यक्तीला पाहिले आणि देवाबरोबर जवळचा नातेसंबंध जोडण्यास मदत करण्याची गरज त्याने ओळखली. हे लोक अशा मेंढरांप्रमाणे होते ज्यांचा कोणी मेंढपाळ नव्हता. येशूला त्यांना पाहून दया आली आणि तो त्यांना सहनशीलतेने शिकवू लागला. (मार्क ६:३४) येशूने जसा लोकांप्रती दृष्टिकोन बाळगला त्या प्रकारे आपणही व्यक्तिगत रीत्या प्रत्येकाला सहानुभूती दाखवण्यास प्रवृत्त होऊ. हे आपल्या आवाजावरून आणि आपल्या चेहऱ्यावरील हावभावांवरून दिसून येईल. प्रचार कार्याला आपण प्राधान्य देऊ आणि प्रत्येक व्यक्तीच्या गरजांनुसार शब्दांची निवड करून आपण तिच्याबद्दल काळजी व्यक्त करू.—१ करिंथ. ९:१९-२३.
४. आपण कनवाळूपणा धारण का केला पाहिजे?
४ जगभरात अनेक लोक राज्य सुवार्तेला आणि आपण त्यांच्यात घेत असलेल्या आस्थेप्रती, चांगला प्रतिसाद देत आहेत. कनवाळूपणा धारण करण्याद्वारे आपण आपल्या दयाळू असणाऱ्या यहोवा देवाचा आदर आणि गौरव करतो.—कलस्सै. ३:१२.