वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/११ पृ. १
  • सर्वात आनंददायक काम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्वात आनंददायक काम
  • आमची राज्य सेवा—२०११
  • मिळती जुळती माहिती
  • लोकांना शिकवा आणि शिष्य बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला आपण मदत कशी करू शकतो?—भाग २
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • शिष्य बनवण्याच्या कार्यातून आनंद मिळवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
    आमची राज्य सेवा—२००४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०११
km १/११ पृ. १

सर्वात आनंददायक काम

१. आज आपल्या दिवसांत कोणत्या प्रकारचे बरे करण्याचे आध्यात्मिक काम चालले आहे?

१ पहिल्या शतकात ज्या लोकांनी, लोकांचे आजार बरे होताना पाहिले त्या सर्वांना अत्याधिक आनंद झाला. (लूक ५:२४-२६) आपल्या दिवसांत आज आपल्याला, लोकांना यहोवाची ओळख करून देण्याच्या कामामुळे अत्याधिक आनंद होतो. (प्रकटी. २२:१, २, १७) यहोवाचे वचन आणि त्याचा पवित्र आत्मा यांमुळे लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेले अनुभव वाचून आपल्याला किती आनंद होतो! पण याहूनही अधिक आनंद आपल्याला, प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करण्याच्या कामात सहभाग घेऊन मिळतो.

२. एखाद्याला सत्य शिकवताना आपण कोणता आनंद अनुभवतो?

२ देवाचे नाव काय आहे? तो मानवजातीवरील दुःख का काढून टाकत नाही? त्याच्या राज्यामुळे मानवजातीला कोणते फायदे मिळतील? या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास आपल्याला आनंद होतोच पण, सत्य कळाल्यावर विद्यार्थ्याच्या चेहऱ्‍यावर झळकणारा आनंद पाहूनही आपल्या मनाला समाधान मिळते. (नीति. १५:२३; लूक २४:३२) विद्यार्थी जसजशी प्रगती करतो तसतसे तो यहोवाच्या नावाचा वापर करू लागतो, त्याची वेशभूषा आणि केशभूषा बदलते, त्याच्या हानीकारक सवयी तो सोडून देतो आणि दुसऱ्‍यांना साक्ष देण्यास सुरुवात करतो. त्याने जर सर्मपण आणि बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती केली तर तो आपला बांधव आणि सहकर्मचारी बनतो. विद्यार्थ्याची प्रत्येक बाबतीत प्रगती पाहून आपल्याला आनंद होतो.—१ थेस्सलनी. २:१९, २०.

३. बायबल अभ्यास सुरू करायचा असेल तर तुम्ही कोणती व्यावहारिक पावले उचलू शकता?

३ तुम्हीही सहभाग घेऊ शकता का? या आनंदाच्या कामात तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर बायबल अभ्यास संचालित करण्याचा सुहक्क मिळावा, म्हणून यहोवाला विनंती करा आणि आपल्या प्रार्थनांच्या अनुषंगाने कार्य करा. (१ योहा. ५:१४) लोक जेथे कोठे सापडतात तेथे त्यांना साक्ष द्या. प्रत्येक संधीचा फायदा घेऊन बायबल अभ्यास सुरू करा. (उप. ११:६) तुम्हाला कोणी आस्थेवाईक भेटतो व तुम्ही सत्याचे बी पेरता तेव्हा पेरलेला बी अंकुरावा म्हणून पाणी घाला म्हणजे त्या व्यक्‍तीची पुन्हा भेट घेता.—१ करिंथ. ३:६-९.

४. कापणीच्या कामात आपण लोकांना बायबलचा अभ्यास करण्याचे उत्तेजन तातडीने का दिले पाहिजे?

४ अजूनही पुष्कळ लोक असे आहेत ज्यांना सत्याची भूक व तहान आहे. त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास करून ही भूक व तहान कोण बरे भागवू शकेल? (मत्त. ५:३, ६) तेव्हा, कापणीचे काम संपण्याआधी आपण प्रचार व शिष्य बनवण्याच्या कामात स्वतःला झोकून देऊ या.—यश. ६:८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा