वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१० पृ. १-२
  • शेते कापणीसाठी तयार झाली आहेत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शेते कापणीसाठी तयार झाली आहेत
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • मिळती जुळती माहिती
  • कापणीच्या कार्यात तत्पर राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • कापणीच्या कामकऱ्‍यांनो आनंदी व्हा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • कापणीच्या कामासाठी तातडीने कामकरी हवेत!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • आध्यात्मिक कापणीच्या महान कार्यात स्वतःला झोकून द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१०
km ११/१० पृ. १-२

शेते कापणीसाठी तयार झाली आहेत

१. आज कोणते महत्त्वाचे काम सुरू आहे?

१ शोमरोनी स्त्रीला साक्ष दिल्यानंतर, येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले: “आपली नजर वर टाकून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.” (योहा. ४:३५, ३६) आध्यात्मिक कापणीचे काम सुरू झाले होते आणि या कामाचा विस्तार पूर्ण जगभरात होणार होता, हे येशू पाहू शकत होता. आता येशू स्वर्गात असला तरी, कापणीच्या कामात त्याचाही सहभाग आहे. (मत्त. २८:१९, २०) कापणीचे काम जसजसे शेवटास येते तसतसे ते आणखी जोरात होण्याची कोणती चिन्हलक्षणे आहेत?

२. कोणत्या घडामोडी दाखवतात की जगभरात कापणीचे काम जोरात चालले आहे?

२ जगभर चाललेले कापणीचे काम: सन २००९ च्या सेवा वर्षादरम्यान जगभरात प्रचारकांची संख्या ३.२ टक्क्यांनी वाढली. ज्या देशात प्रचार कार्य करण्यास मनाई आहे तेथे १४ टक्के वाढ झाली आहे. दर महिन्याची गृह बायबल अभ्यासांची संख्या ७६,१९,००० इतकी होती. ही संख्या प्रचारकांच्या उच्चांकापेक्षा व आदल्या वर्षाच्या बायबल अभ्यासांच्या संख्येपेक्षा जवळजवळ अर्ध्या लाखाने अधिक होती. बऱ्‍याच देशात हे काम जोमाने होत असल्यामुळे, प्रशिक्षित पायनियरांची अधिक गरज भासत आहे. अनेक देशात परकीय भाषा बोलणाऱ्‍या क्षेत्रात कमालीची वाढ होत आहे. यावरून स्पष्ट दिसते, की यहोवा शेवटास आलेल्या कापणीच्या कार्याला वेग आणत आहे. (यश. ६०:२२) तुम्ही प्रचार कार्य करत असलेल्या क्षेत्राबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगता का?

३. आपल्या क्षेत्रातील कापणीबद्दल काही साक्षीदार कोणता निष्कर्ष काढतील?

३ तुमच्या क्षेत्रातील कापणी: “मी जेथे प्रचार करतो ते फलदायी क्षेत्र नाही,” असे काही म्हणतील. हे खरे आहे की काही क्षेत्रे दुसऱ्‍या क्षेत्रांप्रमाणे फलदायी नसतील. त्यामुळे काही साक्षीदारांना वाटेल, की अशा क्षेत्रातील लोकांनी संदेशाला जो प्रतिसाद द्यायचा होता तो दिला आहे तेव्हा आत्ता फक्‍त काही उरल्यासुरल्या लोकांनाच शोधून काढणे बाकी आहे. हे खरे आहे का?

४. प्रचार कार्याबद्दल आपण कोणती योग्य मनोवृत्ती बाळगली पाहिजे, आणि का?

४ कापणीचे काम सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण जोमाने केले जाते. हे काम त्वरेने का केले पाहिजे याबद्दल येशूने काय म्हटले ते विचारात घ्या: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्त. ९:३७, ३८) पीक केव्हा व कोठे उगवते यासाठी कापणीचा धनी, यहोवा जबाबदार आहे. (योहा. ६:४४; १ करिंथ. ३:६-८) आपले काय काम आहे? “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीहि आपला हात आवरू नको,” असे बायबल उत्तर देते. (उप. ११:४-६) यास्तव, कापणीचे काम शेवटास आले असताना ही हात आटोपण्याची वेळ नाही!

५. फलदायी दिसत नसलेल्या क्षेत्रातसुद्धा आपण आवेशाने प्रचार का करत राहिले पाहिजे?

५ कापणी करत राहा: आपण आपल्या क्षेत्रात बऱ्‍याच वेळा कार्य केले असले आणि आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी आपण हे कार्य पूर्ण आवेशाने आणि तातडीने केले पाहिजे. (२ तीम. ४:२) कारण, जगात होत असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे लोकांची मनोवृत्ती बदलू शकते व भविष्याचा ते कदाचित गांभीर्याने विचार करू लागतील. तरुण जन जसजसे मोठे होतात, तसतसे त्यांना सुरक्षिततेची व मानसिक शांतीची गरज भासेल. आपली चिकाटी पाहून इतर लोक प्रभावित होतील. होय, ज्यांनी पूर्वी राज्याच्या संदेशाला प्रतिसाद दिला नव्हता ते कदाचित भविष्यात देतील. आणि जे मुद्दामहून आपला संदेश नाकारतात त्यांनासुद्धा येणाऱ्‍या नाशाविषयी बजावले पाहिजे. पण, आपल्या क्षेत्रातील अनेक लोक आपला संदेश ऐकण्यात आवड तर दाखवतच नाहीत उलट आपला कडाडून विरोधही करत असतील तर आपण जरा जास्तच काळजी घेतली पाहिजे.—यहे. २:४, ५; ३:१९.

६. आपल्या क्षेत्रात समस्या येत असतील तर, कोणती गोष्ट आपल्याला आपला आवेश टिकवून ठेवण्यास मदत करेल?

६ आपल्या क्षेत्रात समस्या येत असतील तर, कोणती गोष्ट आपल्याला आपला आवेश टिकवून ठेवण्यास मदत करेल? घरोघरच्या कार्यासोबत आपण इतर मार्गांनी, जसे की व्यापारी क्षेत्रात किंवा टेलिफोनद्वारे प्रचार करू शकतो. किंवा, लोकांशी वेगवेगळ्या विषयांवर बोलून आपण आपल्या सादरतांमध्ये नाविन्य आणू शकतो. सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यास योग्य असलेल्या लोकांना शोधताना आपण व्यवहारकुशलता आणि समंजसपणा दाखवू शकतो. (प्रेकृ १३:४८) आपण आपल्या आराखड्यात काही फेरबदल करू शकतो आणि संध्याकाळी किंवा इतर वेळी लोक जेव्हा घरी असतात तेव्हा प्रचारकार्याला जाऊ शकतो. सगळ्यांना सुवार्ता समजावी याकरता आपण नवीन भाषा शिकू शकतो. आपली सेवा आणखीन वाढवण्याकरता आपण सामान्य पायनियरिंग करू शकतो. किंवा आपण अशा ठिकाणी राहायला जाऊ शकतो जेथे कापणी करणारे कामगार कमी आहेत. कापणीच्या कामाबद्दल आपण योग्य मनोवृत्ती बाळगली तर या महत्त्वपूर्ण कामात होता होईल तितके भाग घेण्याचा आपण प्रयत्न करू.

७. केव्हापर्यंत हे गोळा करण्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे?

७ धान्य गोळा करण्यासाठी शेतकऱ्‍यांजवळ खूप कमी वेळ असतो म्हणून, जोपर्यंत त्यांचे हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते निश्‍चिंत बसत नाहीत किंवा कामाचा वेग कमी करत नाहीत. आध्यात्मिक कापणीच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू होते. केव्हापर्यंत हे गोळा करण्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे? ‘युगाच्या समाप्तीदरम्यान’ व “शेवट” येईपर्यंत. (मत्त. २४:१४; २८:२०) यहोवाच्या प्रमुख सेवकाप्रमाणे, आपल्यावर सोपवलेले काम आपल्याला पूर्ण करायचे आहे. (योहा. ४:३४; १७:४) यास्तव, पूर्ण आवेशाने, आनंदाने आणि योग्य मनोवृत्तीने आपण ही सेवा करत राहू या. (मत्त. २४:१३) कारण कापणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही!

[२ पानांवरील संक्षिप्त आशय]

कापणीचे काम सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण जोमाने केले जाते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा