ऑगस्ट ९ च्या सप्ताहाचा आराखडा
ऑगस्ट ९ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: पहिले राजे २१-२२
क्र. १: पहिले राजे २२:१-१२
क्र. २: उतारवयात जोडीने प्रवेश करणे (fy पृ. १६३ परि. १-३)
क्र. ३: प्रार्थनेविषयी आपण एलियाच्या उदाहरणावरून काय शिकतो? (याको. ५:१८)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे. आमची राज्य सेवा ऑगस्ट २००४ पान १ वरील लेखावर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. बायबल अभ्यास चालवण्याचे व बायबल विद्यार्थ्यांना समर्पणापर्यंत प्रगती करण्यास मदत करण्याचे ध्येय ठेवण्यास श्रोत्यांना उत्तेजन द्या.
१० मि: आपले सेवाकार्य वाढवण्याचे काही मार्ग—भाग ४. आमची राज्य सेवा मार्च २००७, पृष्ठ ५, परिच्छेद ६ ते पृष्ठ ६, परिच्छेद १ पर्यंतच्या भागावर आधारित भाषण. बेथेलमध्ये सेवा करत असलेल्या किंवा केलेल्या अथवा राज्य सभागृह बांधकाम कार्यात साहाय्य केलेल्या एक अथवा दोन प्रचारकांची मुलाखत घेऊन, सेवेच्या या विशेषाधिकाराचा त्यांनी कशा प्रकारे आनंद लुटला, याबद्दल विचारा.
१० मि: “देवाच्या सेवकांसाठी एक तरतूद.” प्रश्न व उत्तराने चर्चा. पुढील विभागीय संमेलनाची तारीख माहीत असेल तर ती सांगा. गेल्या विभागीय संमेलनाचा त्यांना फायदा कसा झाला त्यावर टिपणी करण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा.