“अवेळी” प्रचारकार्य करण्याकरता प्रशिक्षित
१ “अवेळी” म्हणजे त्रासदायक परिस्थितीत प्रामाणिक हृदयाच्या लोकांचा शोध घेण्याचे खास प्रशिक्षण देण्यासाठी, आपल्याला आमची राज्य सेवा यातून मिळणाऱ्या समयोचित सूचनांबद्दल आपण कृतज्ञ आहोत, नाही का? (२ तीम. ४:२) या सूचनांपैकी काही तुम्ही वापरून पाहिल्या आहेत का? बायबलमधील सुवार्ता ऐकण्याच्या किंवा नाकारण्याच्या घरमालकाच्या हक्काचा आदर करण्यास आपल्याला शिकवण्यात आले आहे. हे योग्यच आहे कारण वेगवेगळ्या धर्माच्या लोकांकडे आपण स्वतःहून जातो, त्यांनी आपल्याला त्यांच्या घरी बोलवलेले नसते. प्रस्तावना सुरू करण्याआधी घरमालकाला ऐकायची इच्छा आहे किंवा नाही हे आपण ठरवतो. अशा प्रकारे आपण त्याला हे समजायला मदत करतो की आपण त्याच्या इच्छेचा आदर करतो.
२ सावधगिरी, सुज्ञपणा व व्यवहारचातुर्याचा उपयोग करून आपण समस्या टाळण्याचा होता होईल तितका प्रयत्न करतो. कौशल्यपूर्ण बोलण्यामध्ये, काय बोलायचे नाही हे समजणे देखील गोवलेले आहे. (योहा. १६:१२) आपण बळजबरीने किंवा काही आमिष दाखवून लोकांचे धर्मपरिवर्तन करणाऱ्यांसारखे नाही. ख्रिस्ताचे शिष्य शांती व सांत्वनाचा संदेश देतात. पण, आपल्या क्षेत्रातील सर्वच जण त्याचा स्वीकार करण्यास किंवा आपले चांगले हेतू समजण्यास तयार नसतात. त्यामुळे, ख्रिश्चनांनी त्यांच्या विरोधकांपासून किंवा चिथावणी करणाऱ्यांपासून पळ काढला पाहिजे. (मत्त. १०:२३; प्रे. कृत्ये १४:५-७) गेल्या काही महिन्यांत विरोध होत असलेल्या क्षेत्रांतील बांधवांनी असे केले आहे व जे सुवार्ता ऐकू इच्छितात अशा लोकांवर लक्ष केंद्रित केले आहे. याचे त्यांना चांगले परिणाम लाभले आहेत. पण, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आधी विरोध करणारे काही जण नंतर वेगवेगळ्या कारणांमुळे सुवार्ता ऐकणारे बनू शकतात.
३ वडिलांनी, धार्मिक बाबतीत संवेदनशील असलेल्या क्षेत्रात कार्य करताना सावधगिरी बाळगण्याविषयी, छापील प्रकाशनांतील सूचना वेळोवेळी दिल्यामुळे बांधवांना बरीच मदत झाली आहे. (२ पेत्र ३:१, २) जानेवारी ते मे व ऑगस्ट २००८ च्या आमची राज्य सेवा यांतील काही सूचनांचा उल्लेख, सभांतील काही भागांत आणि एखादा गट क्षेत्राला जाण्यापूर्वी केला जाऊ शकतो. यामुळे सर्वांना, प्रचार करण्याच्या आपल्या जुन्या पद्धती व ज्यांमुळे गैरसमज होऊ शकतात असे शब्द टाळण्यास व प्रचाराच्या सध्याच्या व्यवस्थेला सहकार्य देण्यास मदत होईल. या सूचना बांधवांना वारंवार दिल्यास सार्वजनिक ठिकाणी प्रचारासाठी एकत्र जमणारे सेवा गट, जोरजोरात बोलण्याचे किंवा इतरांचे लक्ष अनावश्यकपणे आकर्षित करण्याचे टाळतील.
४ याशिवाय, आपण सर्वांनी देवाच्या वचनाचा अभ्यास आणि प्रार्थना करण्याद्वारे समस्या येण्यापूर्वीच स्वतःला तयार केले पाहिजे. आपला विश्वास जिवंत असला पाहिजे जो आपल्याला धैर्याने कृती करण्यास प्रवृत्त करेल. (एज्रा ७:१०; स्तो. ७८:८; याको. २:१७. w०९ ९/१५, पृष्ठे १२-१५ पाहा.) यहोवावरील आपला विश्वास, आपल्याला जमावाद्वारे घेरले जाते तेव्हा शांत राहण्यास आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर आपल्या कार्याचे आदरपूर्वक स्पष्टीकरण देण्यास मदत करेल.
५ तुमच्या मनात जर भीती बसली असेल व यामुळे प्रचारकार्यात तुमचे जाणे कमी झाले असेल तर निराश होऊ नका. येशूच्या मृत्युनंतर त्याच्या सर्व प्रेषितांनी काही काळ आपले प्रचारकार्य थांबवले होते, पण त्यांनी लगेचच पुन्हा प्रचाराला जायचे सुरू केले हे आठवा. (मत्त. २६:५६; प्रे. कृत्ये ५:२८) आपला संदेश नाकारला जातो तेव्हा खासकरून आपण प्रेषितांची कृत्ये १८:९, १० येथील येशूचे आश्वासन लक्षात ठेवले पाहिजे. सुवार्तेचा प्रचार करताना धैर्य मिळावे म्हणून यहोवाला प्रार्थना करा. (प्रे. कृत्ये ४:२९) घरमालकांच्या अंतःकरणापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा. यहोवा अंतःकरण पाहतो व नम्र हृदयाच्या लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो हे कधीही विसरू नका.—१ शमु. १६:७; योहा. ६:४४.