वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१० पृ. २-३
  • तुमच्याकडे पाहून इतर जण काय शिकू शकतात?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्याकडे पाहून इतर जण काय शिकू शकतात?
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • मिळती जुळती माहिती
  • आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा
    आमची राज्य सेवा—२००७
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—नवीन प्रचारकांना प्रशिक्षण द्या
    आपली राज्य सेवा—२०१५
  • सेवेमध्ये अधिक करू पाहणे
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१०
km ४/१० पृ. २-३

तुमच्याकडे पाहून इतर जण काय शिकू शकतात?

१ येशू म्हणाला: “माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका.” (मत्त. ११:२९) फक्‍त बोलण्याद्वारेच नव्हे तर चांगले उदाहरण ठेवण्याद्वारेही त्याने इतरांना शिकवले. येशूचे शिष्य त्याला पाहून कितीतरी गोष्टी शिकले असतील. तो सौम्य, दयाळू व प्रेमळ होता. (मत्त. ८:१-३; मार्क ६:३०-३४) तो खरोखरच नम्र होता. (योहा. १३:२-५) येशूसोबत प्रचारकार्य करताना, तो किती मेहनती होता आणि किती प्रभावीपणे लोकांना साक्ष द्यायचा हे त्याच्या शिष्यांनी पाहिले होते. (लूक ८:१; २१:३७, ३८) आपल्याला प्रचारकार्य करताना पाहून इतरांवर त्याचा काय परिणाम होतो?

२ घरमालक: आपल्या सभ्य पेहरावाचा, चांगल्या सवयींचा आणि लोकांबद्दलच्या आपल्या आस्थेचा घरमालकांवर जबरदस्त प्रभाव पडू शकतो. (२ करिंथ. ६:३; फिलिप्पै. १:२७) आपण नेहमी बायबलचा वापर करतो हे ते पाहतात. इतर जण आपले आदरपूर्वक बोलणे ऐकून प्रभावित होतात. वर उल्लेखलेल्या बाबतींत उत्तम उदाहरण मांडल्याने राज्य संदेशाकडे लोक आकर्षित होऊ शकतात ही गोष्ट कधीही क्षुल्लक लेखू नका.

३ आपले बंधुभगिनी: आपल्या बंधुभगिनींवरही आपण सकारात्मक प्रभाव पाडू शकतो. प्रचारकार्यातील आपला आवेश पाहून तेही आवेशी होतील. जसे लोखंड लोखंडाला तीक्ष्ण करते त्याप्रमाणे चांगली तयारी करून सादर केलेल्या आपल्या प्रस्तावना पाहून बांधवही त्यांची कौशल्ये सुधारण्यास प्रवृत्त होतील. (नीति. २७:१७) आस्था दाखवणाऱ्‍यांची न विसरता केलेली अचूक नोंद व तत्परतेने त्यांची घेतलेली पुनर्भेट इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देईल. आपण घरमालकाशी सुज्ञपणे व समजदारीने बोलतो हे पाहून इतरही तसे करण्यास प्रवृत्त होतील. आपले सेवाकार्य पूर्णपणे पार पाडण्याद्वारे आपण आपल्या बांधवांवर चांगला प्रभाव पाडू शकतो.—२ तीम. ४:५.

४ त्यामुळे, आपल्या वागण्या-बोलण्याचा व आपल्या उदाहरणाचा इतरांवर कसा परिणाम होतो याचे आपण वेळोवेळी परीक्षण केले पाहिजे, नाही का? आपल्या चांगल्या उदाहरणाने यहोवा आनंदी होईल व प्रेषित पौलाच्या भावनांसारख्याच आपल्या देखील भावना असतील. त्याने म्हटले: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.”—१ करिंथ. ११:१.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

१. येशूला प्रचारकार्य करताना पाहून त्याचे शिष्य काय शिकले?

२. प्रचारकार्य करताना आपल्या वर्तनाचा घरमालकांवर चांगला प्रभाव कसा पडू शकतो?

३. आपण आपल्या बांधवांवर सकारात्मक प्रभाव कसा पाडू शकतो?

४. आपण वेळोवेळी स्वतःचे परीक्षण का केले पाहिजे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा