वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१० पृ. ६
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१०
आमची राज्य सेवा—२०१०
km ३/१० पृ. ६

घोषणा

◼ साहित्य सादरता मार्च: बायबल नेमके काय शिकवते? हे प्रकाशन जिथे दिले जाते किंवा ज्या घरमालकांकडे हे पुस्तक आधीच आहे तिथे बायबल अभ्यास सुरू केला पाहिजे ही गोष्ट प्रचारकांनी लक्षात ठेवली पाहिजे. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज. आवड दाखवलेल्या तसेच स्मारक विधीला किंवा संमेलनांना अथवा अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्या परंतु नियमित रीत्या सभांना येत नसलेल्या लोकांना आपण पुन्हा भेटायला जातो तेव्हा त्यांना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक द्यावे. त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्याचा आपला मुख्य हेतू असला पाहिजे. जून: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकाकडे हे पुस्तक आधीपासून असल्यास प्रचारक, पिवळ्या पडणाऱ्‍या कागदावर किंवा १९९५ च्या आधी छापलेले कोणतेही १९२ पानांचे पुस्तक देऊ शकतात.

◼ टेहळणी बुरूज व सावध राहा! यांचे नवीन अंक मंडळीत आल्याबरोबर ते प्रचारकांना उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून क्षेत्रात देण्याअगोदर बंधुभगिनी त्यातील लेख वाचून काढू शकतात.

◼ मार्च ३०, २०१०, मंगळवार या दिवशी आपण स्मारक विधी साजरा करणार आहोत. जर तुमची सभा त्यादिवशी येत असेल तर तुम्ही ती आठवड्याच्या इतर दिवशी घेण्याचे ठरवू शकता. जर अनेक मंडळ्या एकच सभागृह वापरत असतील व सभांच्या वेळा बदलणे शक्य नसेल तर त्या रद्द करू शकता. सेवा सभेतील भाग तुमच्या मंडळीला खासकरून लागू होत असतील तर ते भाग दुसऱ्‍या सेवा सभेत घेतले जाऊ शकतात.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

“देवाच्या प्रेमात टिकून राहा” —मराठी

यहोवाचे गुणगान करा—फक्‍त गाण्याचे बोल (५५ गीते) —नेपाळी

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक —इंग्रजी, तेलगू, मल्याळम, हिंदी

देवाचे मार्गदर्शन—परादीसकडे जाणारा मार्ग —मल्याळम, हिंदी

समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? —इंग्रजी, हिंदी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा