ईश्वरशासित सेवा प्रशाला
डिसेंबर २८, २००९ ने सुरु होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल.
१. आजचे ख्रिस्ती अनुवाद १४:१ मधील तत्त्वाचे पालन कसे करू शकतात? [w०५ १/१ पृ. २८; w०४ ९/५ पृ. २७ परि. ५]
२. अनुवाद २०:५-७ मधील तत्त्वाचा आपण ख्रिस्ती मंडळीत कसा अवलंब करू शकतो? [w०४ ९/१५ पृ. २७ परि. ६]
३. युद्धाच्या बाबतीत इस्राएल राष्ट्र इतर राष्ट्रांपासून वेगळे कसे होते? (अनु. २०:१०-१५, १९, २०; २१:१०-१३) [cl पृ. १३४-१३५, परि. १७]
४. आपण यहोवाची सेवा उल्हासित मनाने कशी करू शकतो? (अनु. २८:४७) [w९५ १/१५ पृ. १६ परि. ४-५]
५. यहोवाला इस्राएल लोकांबद्दल किती प्रेम आहे ते अनुवाद ३२:९, ११, १२ मध्ये दिलेल्या तुलनेवरून कळते. तर पालकांना या तुलनेचा कसा लाभ होतो? [w०१ १०/१ पृ. ९ परि. ७-९]
६. हेरांचा पिच्छा करत आलेल्या राजाच्या लोकांना राहाब चुकीची माहिती का देते? (यहो. २:४, ५) [w०४ १२/१ पृ. ९ परि. ६]
७. यहोशवा ३:१५, १६ मधील इस्राएलांच्या उदाहरणावरून आपण कोणता धडा शिकतो? [w०४ १२/१ पृ. ९ परि. ६]
८. आखानाने केलेल्या चोरीबद्दल यहोशवाने जे पाऊल उचलले त्यावरून आपण काय शिकू शकतो? (यहो. ७:२०-२५) [w०४ १२/१ पृ. ११ परि. ४]
९. यहोशवा ९:२२, २३ वरून देवाच्या वचनातील गोष्टी खऱ्या ठरतात हे कसे स्पष्टपणे दिसून येते? [w०४ १२/१ पृ. ११ परि. ३]
१०. कालेबच्या उदाहरणावरून आपल्याला कोणते उत्तेजन मिळते? (यहो. १४: ८, १०-१२) [w०४ १२/१ पृ. १२ परि. २; w९३ ५/१५ पृ. २९ परि. १]