घोषणा
◼ साहित्य सादरता नोव्हेंबर: बायबल नेमके काय शिकवते. घरमालकाकडे हे पुस्तक असल्यास, ज्या पुस्तकांची पाने पिवळी पडत आहेत अशी १९२ पानी पुस्तके किंवा १९९५ सालाआधी छापण्यात आलेले कोणतेही पुस्तक सादर केले जाऊ शकते. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. घरात मुले असतील तर, बायबल कथांचं माझं पुस्तक सादर करा. जानेवारी: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकाकडे हे पुस्तक असेल तर प्रचारकाने, पिवळ्या पडणाऱ्या कागदावर छापलेले अथवा १९९५ सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पानी पुस्तक त्यांना सादर करावे. फेब्रुवारी: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक उपलब्ध असल्यास सादर करावे.
◼ शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे २०१० च्या मराठीतील पुस्तिकेच्या परिशिष्टात वापरण्यात आलेल्या वार्षिक वचनात थोडा फेरबदल करण्यात आला आहे. सुधारित वार्षिक वचन पुढील प्रमाणे असेल: ‘प्रेम सर्वकाही सहन करते. प्रेमाचा कधीही अंत होत नाही.’—१ करिंथ. १३:७, ८, NW.
◼ अमेरिकन संकेत भाषेत उपलब्ध असलेल्या नवीन डिव्हीडी:
पहिले व दुसरे करिंथकर
बायबलच्या प्राथमिक शिकवणी
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
प्रकटीकरण याचा भव्य कळस जवळ आहे! —इंग्रजी
◼ पुढील माहितीपत्रकांचा मर्यादित साठा आता उपलब्ध आहे:
देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —बंगाली, हिंदी, तामिळ, तेलगू
जागृत राहा! —बंगाली, गुजराती, हिंदी
तुम्ही त्रैक्य मानावे का? —हिंदी