वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०९ पृ. १
  • आस्थेवाईकांना केव्हा परत भेटावे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आस्थेवाईकांना केव्हा परत भेटावे?
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • गुणग्राहकतेची वाढ करण्यास परतणे
    आमची राज्य सेवा—१९९४
  • पुनर्भेटी करण्यास धैर्य एकवटा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • विलंब न लावता आस्थेचा मागोवा घ्या
    आमची राज्य सेवा—१९९२
  • पुनर्भेटींमुळे बायबल अभ्यास मिळतात
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ११/०९ पृ. १

आस्थेवाईकांना केव्हा परत भेटावे?

१. शिष्य बनविण्यात काय समाविष्ट आहे?

१ शिष्य बनवण्याच्या कार्यात अशा सर्व लोकांना परत जाऊन भेटणे समाविष्ट आहे ज्यांनी यहोवा देवाच्या राज्याच्या व्यवस्थेबद्दल अधिक शिकून घेण्याची आस्था दाखवली आहे. (मत्त. २८:१९, २०) पुनर्भेट कधी घ्यावी हे आपल्या आणि आस्थेवाईक व्यक्‍तीच्या वेळेवर अवलंबून असते. पहिल्या भेटीनंतर आपण लगेचच पुनर्भेट का घेतली पाहिजे?

२, ३. आपण लवकरात लवकर पुनर्भेट का घेतली पाहिजे?

२ लवकरात लवकर पुनर्भेट का घ्यावी? आस्थेवाईकांसाठी “तारणाचा दिवस” आहे तोपर्यत आपण ‘तत्परतेने वचनाचा’ प्रचार करा, या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. यात लोकांनी दाखवलेली आस्था वाढवण्याकरता त्यांच्याकडे लवकरात लवकर पुन्हा जाणे समाविष्ट आहे.—२ करिंथ. ६:१, २; २ तीम. ४:२, पं.र.भा.

३ आस्थेवाईक व्यक्‍तींच्या मनात पेरलेले राज्याचे बी नष्ट करण्याची सैतान संधीच शोधत असतो. (मार्क ४:१४, १५) त्यामुळे, इतरांनी त्यांची आस्था विझवून टाकण्याआधीच आपण पहिल्या भेटीत ज्या विषयावर त्यांच्याशी बोललो होतो त्यावर आणखी चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे पुन्हा लवकरात लवकर गेले पाहिजे

४. पहिल्या भेटीतच तुम्ही पुढच्या भेटीचा पाया कसा घालू शकता?

४ वेळ ठरवा: घरमालकाला खरोखरच आस्था आहे व त्याच्यापासून आपल्याला काहीच धोका नाही याची खात्री करून घेतल्यानंतर पहिल्या भेटीतच पुनर्भेटीची वेळ ठरवणे चांगले असते. एक प्रश्‍न विचारा व त्याचे उत्तर पुढच्या भेटीत द्याल असे सांगा. तुमच्याकडे त्या व्यक्‍तीची माहिती असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला जमत असेल तर लगेच दुसऱ्‍या दिवशी किंवा होता होईल तितक्या लवकर पुन्हा येण्याविषयी विचारा. तुमची पहिली भेट जर शनिवार-रविवारी झाली असेल व आस्थेवाईक व्यक्‍ती इतर दिवशी काम करत असेल तर कदाचित पुढच्याच शनिवार-रविवारी ती तुम्हाला परत भेटायला बोलवेल. अतिसंवेदनशील क्षेत्रात बायबल काय शिकवते हे पुस्तक खरोखर आस्था असणाऱ्‍यांनाच द्यावे आणि तेही दुसऱ्‍या किंवा तिसऱ्‍या पुनर्भेटीच्या वेळी द्यावे असे वडील जन सुचवतील. परत भेटण्याची वेळ तुम्ही ठरवता तेव्हा आपला शब्द पाळा.—मत्त. ५:३७.

५. आपण लवकरात लवकर पुनर्भेट घेतल्याने आपल्याला शिष्य बनवण्याची येशूने दिलेली आज्ञा पूर्ण करण्यास कशी मदत होईल?

५ आस्थेवाईकांकडे लवकरात लवकर जाण्याची आपल्याकडे चांगली कारणे आहेत. म्हणून त्यांना परत भेटण्याची एक वेळ ठरवा व पुनर्भेट घ्या कारण, “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे.” (१ करिंथ. ७:२९) राज्य संदेशाबद्दल आस्था दाखवणाऱ्‍यांकडे आपण जितक्या लवकर जाऊ तितके आपले प्रयत्न यशस्वी होतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा