वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०९ पृ. ४
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००९
आमची राज्य सेवा—२००९
km १०/०९ पृ. ४

घोषणा

◼ साहित्य सादरता ऑक्टोबर: टेहळणी बुरूज. घरमालक आवड दाखवतो तेव्हा, जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका देऊन त्यावर चर्चा करू शकता. घरमालकांकडे ही पत्रिका असेल तर बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोव्हेंबर: बायबल नेमके काय शिकवते. घरमालकाकडे हे पुस्तक आधीच असल्यास, ज्या पुस्तकांची पाने पिवळी पडत आहेत अशी १९२ पानी पुस्तके किंवा १९९५ सालाआधी छापण्यात आलेले कोणतेही पुस्तक सादर केले जाऊ शकते. डिसेंबर: सर्वकाळातील श्रेष्ठ मनुष्य. घरात मुले असतील तर, बायबल कथांचं माझं पुस्तक सादर करा. जानेवारी: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकांकडे हे पुस्तक असेल तर प्रचारकाने, पिवळ्या पडणाऱ्‍या कागदावर छापलेले अथवा १९९५ सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक त्यांना सादर करावे.

◼ इथून पुढे ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचा वार्षिक आराखडा आमची राज्य सेवा यात पुरवणी म्हणून दिला जाणार नाही. तर, प्रत्येक मंडळीला वार्षिक आराखडा मिळेल आणि मग, आराखड्याची एक प्रत राज्य सभागृहाच्या माहितीफलकावर लावण्यात यावी. दुसरी प्रत, नेमणूका तयार करण्यासाठी प्रशाला पर्यवेक्षक स्वतःकडे ठेवतील. प्रचारकांना आमची राज्य सेवा याची व्यक्‍तिगत प्रत मिळत राहील ज्यात, मंडळीचा साप्ताहिक बायबल अभ्यास, ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा यांचा आराखडा दिलेला असेल.

◼ जानेवारी ४, २०१० ने सुरू होणाऱ्‍या आठवड्यापासून मंडळीच्या बायबल अभ्यासात “देवाच्या प्रेमात टिकून राहा” या पुस्तकाचा अभ्यास करण्यात येईल. मंडळ्यांनी पुढील साहित्य मागणी करताना, या पुस्तकाच्या आवश्‍यक साठ्याची मागणी करावी.

◼ आध्यात्मिकतेत चांगले असलेले व बाप्तिस्मा होऊन एक वर्ष पूर्ण झालेले यहोवाचे साक्षीदार बेथेल सेवेसाठी अर्ज भरू शकतात. भारतात बोलल्या जाणाऱ्‍या कोणत्याही भाषेत भाषांतरकार म्हणून प्रशिक्षण प्राप्त करू इच्छिणाऱ्‍या स्वयंसेवकांची सध्या खास गरज आहे. शाखा कार्यालयाकडून किंवा प्रांतीय अधिवेशनांत बेथेलमध्ये सेवा करू इच्छिणाऱ्‍यांसाठी होणाऱ्‍या सभेत हे अर्ज मिळू शकतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा