शाळेत जाण्यास तुम्ही तयार आहात का?
१. शाळा सुरू होते तेव्हा तुम्हाला कोणत्या संधी मिळू शकतात?
१ मुलांनो, तुम्ही नुकतेच शाळेला जाऊ लागला असाल किंवा शाळेचे हे तुमचे नवीन वर्ष असेल. आणि तुम्हा ख्रिश्चन मुलांना नवीन समस्यांचा व दबावांचा सामना करावा लागेल. पण, “सत्याविषयी साक्ष” देण्याच्या नवीन संधी देखील तुम्हाला मिळू शकतात. (योहा. १८:३७) तर मग, साक्ष देण्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार आहात का?
२. शाळेत येणाऱ्या समस्यांना तोंड देण्याकरता तुमच्याजवळ कोणती मदत उपलब्ध आहे?
२ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हावे म्हणून तुम्हाला यहोवाकडून, तुमच्या पालकांकडून आणि विश्वासू व बुद्धिमान दासाकडून पुष्कळ प्रशिक्षण मिळाले आहे. (नीति. १:८; ६:२०; २३:२३-२५; इफिस. ६:१-४; २ तीम. ३:१६, १७) त्यामुळे तुमच्या शाळेत कोणत्या समस्या तुम्हाला येऊ शकतात हे आतापर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आले असेल. देवाच्या अपेक्षांबद्दलचे तुम्हाला मिळालेले प्रशिक्षण व शाळेत तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचे ज्ञान तुम्हाला साक्ष देण्यासाठी तयार करेल. (नीति. २२:३) “तरुणांचे प्रश्न” याचा पहिला खंड तसेच सावध राहा! यात प्रकाशित झालेल्या लेखांतील सूचनांचा व शास्त्रवचनीय मार्गदर्शनाचा गंभीरपणे विचार करा.
३. तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी चांगली साक्ष देऊ शकता?
३ शाळेतील अनोख्या क्षेत्रामुळे साक्ष देण्याच्या वेगवेगळ्या संधी तुम्हाला मिळतील. इतर जण जेव्हा तुमची वेशभूषा, तुमचे वागणे-बोलणे, वर्गसोबत्यांबद्दल व शिक्षकांबद्दल तुम्हाला असलेला आदर, शिवाय, तुमचे मार्क पाहतात आणि जीवनात तुम्ही स्थिर आहात हे जेव्हा त्यांना जाणवते तेव्हा काही जण तुम्हाला विचारतील “तुम्ही इतके वेगळे का आहात?” (मला. ३:१८; योहा. १५:१९) तेव्हा तुम्हाला साक्ष देण्याची व तुमच्या विश्वासांबद्दल सांगण्याची एक संधी मिळेल. (१ तीम. २:९, १०) वर्षातून कधी कधी तुम्हाला राष्ट्रीय समारंभात किंवा सणात सहभागी होण्याच्या दबावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही त्यात सहभागी का होत नाही असे कोणी तुम्हाला विचारल्यास तुम्ही असे म्हणाल का, की: “हे माझ्या धर्माच्या विरोधात आहे. मी एक यहोवाचा साक्षीदार आहे?” की, तुमचा प्रेमळ पिता यहोवा याची साक्ष देण्यासाठी तुम्ही त्या संधीचा उपयोग कराल? चांगली तयारी करण्याकरता जर तुम्ही यहोवाचे मार्गदर्शन घेतले तर तुमच्या वर्गसोबत्यांना, शिक्षकांना व इतरांना तुम्ही चांगली साक्ष देऊ शकाल.—१ पेत्र ३:१५.
४. तुमचे शाळेचे नवीन वर्ष चांगले जाईल अशी खातरी तुम्ही का बाळगू शकता?
४ शाळेत जाण्याबद्दल तुमच्या मनात थोडी धाकधूक असेल पण हे लक्षात ठेवा की, तुमचे शाळेतील वर्ष चांगले जावे अशी सदिच्छा बाळगणारे अनेक जण तुमच्या पाठीशी आहेत. याशिवाय, तुमच्या अनोख्या क्षेत्रात इतरांना साक्ष देण्याची तुम्हाला पुष्कळ संधी मिळेल अशी आमची खातरी आहे. तेव्हा, शाळेला जायला घाबरू नका!