घोषणा
◼ साहित्य सादरता जून: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकांकडे हे पुस्तक आधीच असल्यास, ज्या पुस्तकांची पाने पिवळी पडत आहेत अशी १९२ पानी पुस्तके किंवा १९९२ सालाआधी छापण्यात आलेले कोणतेही पुस्तक सादर केले जाऊ शकते. जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक: सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, जागृत राहा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील, तुम्ही त्रैक्य मानावे का?, नंदनवन आणविणारे सरकार, मृत्यूनंतर आपले काय होते (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी). सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? हे प्रकाशन दिल्यावर शक्य असेल तर पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न प्रचारकांनी करावा. बायबल अभ्यासामुळे घरमालकाचा फायदा कसा होईल हे समजावून सांगण्याकरता थोडक्यात एक प्रात्यक्षिक दाखवा.
◼ आजपर्यंत आपण वापरत असलेले काही शब्द बदलण्याची गरज होती. यामुळे आपली भाषांतरे अधिक अचूक होतील. उदाहरणार्थ, काही भारतीय भाषांमध्ये, आधी प्रचारात असलेला “पवित्र आत्मा” हा शब्द इथूनपुढे “देवाची कार्यकारी शक्ती” असा वापरला जाईल. हा बदल आणि यासारखे इतर बदल, नियमन मंडळाचा सल्ला घेतल्यानंतरच करण्यात आले आहेत, ही खात्री बाळगा.
◼ सन २००९ च्या प्रांतीय अधिवेशनांची सभागृहे आणि अधिवेशन मुख्यालयांचे पत्ते आमची राज्य सेवा याच्या पुढील अंकात येतील.
◼ चालू वर्षाच्या सेवा वर्ष अहवालात ज्या देशांविषयी वेगळी माहिती देण्यात आलेली नाही किंवा नवीन इअरबुकमध्ये ज्या देशांचा पत्ता शेवटल्या पानावर दिलेला नाही अशा देशांना भेट देण्याचे तुम्ही ठरवले असेल तर जाण्याआधी कृपया तुमच्या देशातील शाखा दफ्तराशी संपर्क साधून, तुम्हाला कोणकोणत्या बाबतीत खबरदारी बाळगली पाहिजे किंवा विशेष सूचनांचे पालन केले पाहिजे हे माहीत करून घ्यावे. तुम्ही भेट देणाऱ्या देशात कदाचित प्रचार कार्यावर बंदी असेल. (मत्त. १०:१६) काही देशांत, परदेशातून आलेल्यांनी स्थानिक साक्षीदारांशी किंवा मंडळ्यांशी संपर्क साधणे योग्य नसेल. अनौपचारिक साक्षकार्य करण्याविषयी किंवा आपली प्रकाशने बाळगण्याविषयी काही सूचना असतील. याबाबतीत तुम्ही दाखवत असलेल्या सहकार्यामुळे, तुमच्या स्वतःसाठी आणि राज्य प्रचार कार्यासाठी निर्माण होऊ शकणारे अनेक अनावश्यक अडथळे टाळता येऊ शकतात.—१ करिंथ. १४:३३, ४०.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर —हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ