घोषणा
◼ साहित्य सादरता मे: टेहळणी बुरूज नियतकालिके. स्मारकविधी आणि/किंवा इतर ईश्वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या परंतु मंडळीसोबत सक्रिय नसलेल्या आस्थेवाईक लोकांना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक देण्याचा प्रयत्न करा. या पुस्तकातून गृह बायबल अभ्यास सुरू करा. जून: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकांकडे हे पुस्तक आधीच असल्यास, ज्या पुस्तकांची पाने पिवळी पडत आहेत अशी १९२ पानी पुस्तके किंवा १९९२ सालाआधी छापण्यात आलेले कोणतेही पुस्तक सादर केले जाऊ शकते. जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक: सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, जागृत राहा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील, तुम्ही त्रैक्य मानावे का?, नंदनवन आणविणारे सरकार, मृत्यूनंतर आपले काय होते (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरतो तेव्हा (इंग्रजी).
◼ दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर तिथल्या मंडळीच्या सभा, संमेलने किंवा अधिवेशनांना उपस्थित राहण्याची तुम्ही योजना केली असेल तर, तारखा, वेळ, ठिकाण यांबद्दलची माहिती तुम्ही, त्या देशावर देखरेख करणाऱ्या शाखा कार्यालयास विचारली पाहिजे. शाखा कार्यालयांचे पत्ते या वर्षीच्या वार्षिकपुस्तकाच्या शेवटल्या पानावर आहेत.
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
भूतलावर जीवनाचा चिरकाल आनंद लुटा! —तिबेटी