वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०८ पृ. १
  • प्रचाराकरता धीराची आवश्‍यकता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रचाराकरता धीराची आवश्‍यकता
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • धीर—ख्रिश्‍चनांसाठी आवश्‍यक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • धीर धरणाऱ्‍यास प्रतिफळ मिळेल
    आमची राज्य सेवा—२००४
  • प्रचार कार्य धीर धरण्यास मदत करते
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km १२/०८ पृ. १

प्रचाराकरता धीराची आवश्‍यकता

१ प्रेषित पौलाने ३० पेक्षा अधिक वर्षांपर्यंत सुवार्तिकाच्या कामाला त्याचे प्रमुख काम बनवून समाधान मिळवले. पण कोणत्याही कार्यांत अडथळे हे येतातच. प्रेषित पौलाचे प्रचार कार्यही अडथळ्यांविना नव्हते. (२ करिंथ. ११:२३-२९) तरीपण त्याने प्रचार करायचे थांबवले नाही. (२ करिंथ. ४:१) प्रचार कार्य करण्याकरता लागणारी शक्‍ती ही यहोवाकडून मिळते, हे त्याला समजले होते. (फिलिप्पै. ४:१३) धीर दाखवण्याच्या बाबतीत त्याने आपल्या सर्वांसमोर एक उत्तम उदाहरण मांडले व म्हणूनच तो असे म्हणू शकला: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.”—१ करिंथ. ११:१.

२ परीक्षांचा सामना करणे: दररोज आपल्या अनेक बांधवांना त्यांच्या घरच्यांकडून, सहकर्मींयांकडून किंवा शाळा सोबत्यांकडून थट्टा, विरोध आणि उपेक्षा यांचा सामना करावा लागतो. (मत्त. १०:३५; योहा. १५:२०) वरील पैकी एखादी गोष्ट तुमच्याही बाबतीत खरी असेल. किंवा, कदाचित तुम्हाला एखाद्या आजाराशी झुंजावे लागत असेल, तुमच्या विश्‍वासाची व धीराची परीक्षा घेणाऱ्‍या विकर्षणांचा किंवा मोहांचा तुम्हाला दररोजच सामना करावा लागत असेल. ज्यांनी परीक्षांवर यशस्वीपणे मात केली अशा प्राचीन व आधुनिक काळच्या आपल्या विश्‍वासू बंधूभगिनींच्या उदाहरणाचा अभ्यास करून आपण शक्‍ती मिळवू शकतो.—१ पेत्र ५:९.

३ सेवेमध्ये टिकून राहण्याकरता लागणारी शक्‍ती आपण, “देवाची शस्त्रसामग्री धारण” करून मिळवू शकतो. (इफिस. ६:१०-१३, १५) धीर मिळण्यासाठी आपण प्रार्थना करणे देखील महत्त्वाचे आहे. परीक्षांत टिकून राहण्याकरता देव आपल्याला त्याचा पवित्र आत्मा द्यायला तयार आहे. (२ करिंथ. ६:४-७) आध्यात्मिक युद्धात विजयी ठरण्याकरता आपण देवाच्या निर्बंधांकडे लक्ष दिले पाहिजे. (स्तो. ११९:२४, ८५-८८) एक मूल जसे त्याच्या प्रेमळ पित्याकडून आलेले पत्र वारंवार वाचते तसेच आपणही जर बायबलचे दररोज वाचन केले तर यहोवाबरोबर जोडलेली आपली नाळ आणखी मजबूत होईल. आपण जर नित्य नियमाने व्यक्‍तिगत अभ्यास केला तर आपल्याला, परीक्षांना तोंड देण्याची बुद्धी मिळेल. यामुळे देवाच्या विचारांचा आपल्या निर्णयांवर परिणाम होईल आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा आपला निश्‍चय आणखी पक्का होईल.—नीति. २:१०, ११.

४ धीर धरल्याने आशीर्वाद मिळतात: पौलाच्या बाबतीत जसे झाले तसे, आपणही जर धीराने सेवा करीत राहिलो तर आता आपण यहोवाचे मन आनंदित करू आणि नंतर आपल्याला तसेच इतरांनाही लाभ मिळतील. (नीति. २७:११) तेव्हा, आपल्या सेवेमध्ये टिकून राहण्याचा आपण निश्‍चय करू या आणि हे सिद्ध करून दाखवू या, की आपला विश्‍वास टिकाऊ आहे व तो ‘अग्नीने परीक्षा घेऊनही नाशवंत ठरलेल्या सोन्यापेक्षाही खूप मौल्यवान’ आहे.—१ पेत्र १:६, ७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा