वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०८ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००८
  • उपशिर्षक
  • ऑक्टोबर १३ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर २० ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर २७ ने सुरू होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर ३ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००८
km १०/०८ पृ. २

सेवा सभा आराखडा

ऑक्टोबर १३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

१० मि: स्थानीक घोषणा.

३५ मि: “मंडळीच्या नवीन सभेचा आराखडा.”a वेळ असेल तर उल्लेखीत शास्त्रवचने वाचा आणि श्रोत्यांना त्यावर टिप्पणी देण्यास सांगा.

गीत क्र. ९ (३७)

ऑक्टोबर २० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १२ (११३)

५ मि: स्थानीक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.

२० मि: सेवेतला आनंद टिकवून ठेवा. टेहळणी बुरूज जुलै १, २००५, पृष्ठे २४-२५, परिच्छेद ११-१७ मधील माहितीच्या आधारावर उत्तेजनदायक भाषण. अनेक वर्षांपासून यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या एक अथवा दोन बंधूभगिनींची मुलाखत घ्या. लोक प्रतिसाद देत नाहीत तेव्हाही, सेवेतला आपला आनंद ते कसा काय टिकवू शकले?

२० मि: ऑक्टोबर ते डिसेंबरचे टेहळणी बुरूज सादर करा. नियतकालिकाची थोडक्यात माहिती दिल्यावर, क्षेत्रातील लोकांना कोणते लेख आवडू शकतील व का आवडतील, हे श्रोत्यांना विचारा. संभाषण सुरू करण्याकरता कोणते प्रश्‍न विचारता येऊ शकतात किंवा कोणते शास्त्रवचन दाखवता येईल, हे श्रोत्यांना विचारा. पान ८ वरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून किंवा, स्थानीक क्षेत्रातील लोकांना आवडेल अशा पद्धतीत तयार केलेल्या एका सादरीकरणाचा उपयोग करून, हे मासिक कसे सादर करायचे त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवून वक्‍ता हा भाग संपवतो.

गीत क्र. १८ (१६२)

ऑक्टोबर २७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ३ (३२)

५ मि: स्थानीक घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा.

१० मि: स्थानीक गरजा.

३० मि: “व्यक्‍तिगत आणि कौटुंबिक बायबल अभ्यास अत्यावश्‍यक!”b वेळ असेल तर उल्लेखीत शास्त्रवचने वाचा आणि श्रोत्यांना त्यावर टिप्पणी देण्यास सांगा.

गीत क्र. १७ (१८७)

नोव्हेंबर ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २८ (२२४)

१० मि: स्थानीक घोषणा. प्रचारकांना ऑक्टोबर महिन्याचा सेवा रिपोर्ट देण्याची आठवण करून द्या. नोव्हेंबर १० पासून सुरु होणाऱ्‍या खास पत्रिका मोहिमेसाठी स्थानीक मंडळीने केलेल्या व्यवस्थांबद्दल सांगा. प्रचारकांनी पत्रिकांचा पुरेसा साठा घेतला नसेल तर तो घ्यावा, असे सर्वांना उत्तेजन द्यावे.

२० मि: सन २००९ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला. प्रशाला पर्यवेक्षक, ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आराखड्यातील पुरवणीत, “सूचना” या मथळ्याखाली, नवीन ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चर्चा करतील. या नवीन प्रशालेतील बदलांवर सर्वांचे लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांना नेमणूक मिळते तेव्हा त्यांनी ती न विसरता पूर्ण करावी, बायबलवरील ठळक मुद्द्‌यांच्या भागात एखादी टिपणी देण्याकरता तयारी करावी आणि ईश्‍वरशासित सेवा प्रशाला शिक्षणाचा फायदा घ्या (इंग्रजी) पुस्तकाच्या आधारावर दर आठवडी सभांमध्ये सांगितलेल्या गोष्टींचे आपल्या जीवनात पालन करावे म्हणून सर्वांना उत्तेजन द्या.

१५ मि: आपल्या ‘शिकवण्याच्या कलेत’ सुधारणा करणे. सेवा पर्यवेक्षक किंवा दुसरे अनुभवी वडील टेहळणी बुरूज जानेवारी १५, २००८, पृष्ठे ९-१२ वरील परिच्छेद ५-१८ मधील माहितीतून, प्रभावीपणे शिकवण देण्यात गोवलेल्या पाच मूलभूत गोष्टी ओळखतात व त्यांवर संक्षिप्त टिपणी करतात. एक अथवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या ज्यांना, या माहितीची आपल्या शिकवण्याच्या कलेत सुधारणा करण्यास मदत मिळाली आहे.

गीत क्र. २१ (१९१)

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा