वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०८ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००८
आमची राज्य सेवा—२००८
km ७/०८ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता जुलै व ऑगस्ट: खालीलपैकी कोणतेही ३२-पानी माहितीपत्रक द्यावे. सर्व लोकांकरता असलेले पुस्तक, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, नंदनवन आणविणारे सरकार, देवाचे मार्गदर्शन—नंदनवनाकडे नेणारा मार्ग (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? आणि तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी). सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करावा. घरमालकांजवळ आधीपासूनच हे पुस्तक असल्यास, थोडक्यात बायबल अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवून या पुस्तकाचा चांगला उपयोग कसा करता येईल हे त्यांना दाखवावे. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिके. घरमालकाने आस्था दाखवल्यास, तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने चर्चा करावी.

▪ ऑगस्ट महिन्यात पाच शनिवार-रविवार असल्यामुळे, हा महिना साहाय्यक पायनियरींगकरता उत्तम महिना आहे.

▪ सप्टेंबरपासून विभागीय पर्यवेक्षकांच्या जाहीर भाषणाचा विषय, “सात्विकतेच्या मार्गाने चाला” हा असेल.

▪ शाखा कार्यालय, प्रचारकांच्या वैयक्‍तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी शाखा कार्यालयाला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्यात मंडळीत याची घोषणा करण्याची व्यवस्था करावी; जेणेकरून, ज्यांना साहित्य हवे आहे ते संबंधित बांधवाकडे त्याची ऑर्डर देऊ शकतील. कोणती प्रकाशने खास मागणीची (स्पेशल रिक्वेस्टची) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.

▪ ऑगस्ट ३१, २००८ किंवा त्यानंतर लवकरात लवकर साहित्य व मासिकांची वार्षिक मोजणी केली जावी. ही वार्षिक मोजणी दर महिन्यात लिटरेचर कोऑर्डिनेटर जी मोजणी करतात त्यासारखीच आहे. एकूण संख्या लिटरेचर इनव्हेन्टरी (S-18) फॉर्मवर भरावी. मासिकांची एकूण संख्या, मॅगझीन सर्व्हंट सांगू शकतील. कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सचिवांनी इनव्हेन्टरीची तपासणी करावी. त्यांनी व कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी फॉर्मवर सह्‍या कराव्यात. प्रत्येक कोऑर्डिनेटिंग मंडळीला तीन लिटरेचर इनव्हेन्टरीचे फॉर्म्स मिळतील. मूळ फॉर्म भरून कृपया सप्टेंबर ६ तारखेच्या आत शाखा कार्यालयाला पाठवावा. फॉर्मची कार्बन प्रत मंडळीच्या फाईलसाठी ठेवावी. तिसरी प्रत हिशेबासाठी वापरू शकता.

▪ बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी व ते चालवण्यासाठी अपेक्षा माहितीपत्रकाऐवजी बायबल काय शिकवते हे पुस्तक वापरावे. जोपर्यंत अपेक्षा माहितीपत्रकाचा साठा उपलप्ध राहील, तोपर्यंत ते क्षेत्र सेवेत देता येईल.

▪ स्पेशल रीक्वेस्ट फॉर्म फॉर ॲन्युअल आयटम्स हा फॉर्म मंडळ्यांना पाठवला जात आहे. ज्या मंडळ्यांनी अद्यापही २००९ करता ईयरबुक, कॅलेंडर व शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे या वार्षिक प्रकाशनांच्या साठ्याची विनंती केलेली नाही त्यांनी आपली मागणी लवकरात लवकर पाठवावी. ज्या मंडळ्या किंग्डम हॉल लिटरेचर इनव्हेंटरी अरेंजमेंट या व्यवस्थेखाली आहेत त्यांनी आपल्या मागण्या “कोऑर्डिनेटिंग” मंडळीच्या मार्फतच पाठवाव्यात. पण या कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सचिवाने त्यांच्या लिटरेचर ग्रूपमध्ये असणाऱ्‍या प्रत्येक मंडळीकरता आवश्‍यक साठा मागवण्याची खात्री करावी.

▪ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

तुमची संभाषणाची व शिकवण्याची कला कशी सुधाराल? —बंगाली

▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:

यहोवाचे गुणगान करा (२९ गीते) —मराठी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा