वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०८ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००८
  • उपशिर्षक
  • मे १२ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे १९ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे २६ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून २ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००८
km ५/०८ पृ. २

सेवा सभा आराखडा

मे १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २८ (२२४)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या दुसऱ्‍या सादरीकरणाचा उपयोग करून टेहळणी बुरूज, एप्रिल-जून अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

१५ मि: परीक्षांचा धैर्याने सामना करणे. टेहळणी बुरूज, ऑक्टोबर १, २००६ अंकातील पृष्ठे २५-६, परिच्छेद १५-८ वर आधारित भाषण. एखाद्या विशिष्ट परीक्षेचा सामना करण्यासाठी यहोवाने कशी मदत केली हे निवडक प्रचारकांना विचारा.

२० मि: या उन्हाळ्यात तुम्ही साहाय्यक पायनियरिंग करू शकता का? श्रोत्यांसोबत चर्चा. साहाय्यक पायनियर सेवेच्या अटींबद्दल आमची राज्य सेवा, मार्च २००७ यातील पृष्ठ ४ वरील माहितीची उजळणी करा. ज्यांनी कामावरून रजा घेऊन साहाय्यक पायनियरिंग केली त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले याविषयी सांगण्यास त्यांना आमंत्रित करा. ज्यांनी शाळेच्या सुट्टीदरम्यान साहाय्यक पायनियरिंग केली, त्यांना इतरांनी कशा प्रकारे प्रोत्साहन दिले व मदत केली याबद्दल विचारा. साहाय्यक पायनियरिंग केल्यामुळे त्यांना आध्यात्मिक प्रगती करण्यास कशा प्रकारे मदत मिळाली? ही सेवा करताना त्यांना कोणते आनंददायक अनुभव आले? पात्र असणाऱ्‍या सर्वांना या उन्हाळ्यात साहाय्यक पायनियरिंग करण्याचे प्रोत्साहन द्या.

गीत क्र. १७ (१८७)

मे १९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ११ (८५)

१० मि: स्थानीय घोषणा. प्रश्‍न पेटीची उजळणी करा.

१० मि: स्थानीय गरजा.

२५ मि: “उत्तर कसे द्यायचे हे समजून घ्या.”a वडिलांनी हा भाग हाताळावा. क्षेत्रात सामान्यत: घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपांना सौम्यतेने कसे उत्तर देता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत क्र. ७ (५१)

मे २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ४ (४३)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. मे महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची प्रचारकांना आठवण करून द्यावी.

१५ मि: “माझे जू आपणावर घ्या.”b वेळ असल्यास श्रोत्यांना उल्लेखित शास्त्रवचनांवर टिपणी देण्यास सांगा.

२० मि: “तुम्ही धनवान होऊ शकता!”c सामान्य पायनियर सेवेच्या अटींबद्दल आमची राज्य सेवा, मार्च २००७ यातील पृष्ठ ४ वरील टिपणींचा समावेश करा. १ सप्टेंबर पासून सामान्य पायनियरिंग सेवा करू इच्छिणाऱ्‍यांना, लवकरात लवकर आपले अर्ज देण्याचे प्रोत्साहन द्या.

गीत क्र. २१ (१९१)

जून २ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २७ (२२१)

१० मि: स्थानीय घोषणा.

२० मि: विश्‍वासूपणे कार्य करणाऱ्‍यांना भरपूर आशीर्वाद मिळतात. (नीति. २८:२०) सचिवांचे भाषण आणि श्रोत्यांसोबत चर्चा. मार्च, एप्रिल, आणि मे महिन्यांदरम्यान आपले सेवाकार्य वाढवण्यासाठी मंडळीने केलेल्या प्रयत्नांवर यहोवाने कशा प्रकारे आशीर्वाद दिले ते थोडक्यात सांगा आणि मंडळीची प्रशंसा करा. त्या महिन्यांत किती जणांनी साहाय्यक पायनियरिंग केली, किती नवीन बायबल अभ्यास सुरू करण्यात आले, आणि सेवाकार्याशी संबंधित इतर कोणत्या चांगल्या गोष्टी साध्य करण्यात आल्या त्याविषयी सांगा. स्मारकविधी आणि त्यासाठी आमंत्रणपत्रिका वाटण्याच्या मोहिमेत आलेल्या अनुभवांबद्दल श्रोत्यांना विचारा. सेवाकार्यात आलेले उल्लेखनीय अनुभव प्रदर्शित करता येतील. दोन किंवा तीन प्रचारकांची थोडक्यात मुलाखत घेऊन साहाय्यक पायनियरिंग करताना मिळालेल्या आशीर्वादांविषयी विचारा.

१५ मि: “प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असा.”d श्रोत्यांना, घरोघरच्या सेवाकार्याची तयारी ते कधी व कशा प्रकारे करतात हे सांगण्याचे आमंत्रण द्या.

गीत क्र. ५ (४६)

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा