वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०८ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००८
  • उपशिर्षक
  • मार्च १० ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च १७ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च २४ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च ३१ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल ७ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००८
km ३/०८ पृ. २

सेवा सभा आराखडा

मार्च १० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, जानेवारी-मार्च अंकासोबत स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका कशी सादर करायची त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

२० मि: यहोवा आपल्या लोकांना मार्ग दाखवतो. मार्च १५, २००० टेहळणी बुरूज अंकातील, पृष्ठे १५-२० वरील लेखावर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. श्रोत्यांना मंडळीच्या सभांमध्ये उपस्थित राहिल्याने काय फायदा झाला आणि नियमितपणे सभांमध्ये उपस्थित राहण्याकरता त्यांना कोणत्या अडथळ्यांवर मात करावी लागली याविषयी त्यांना विचारा.

१५ मि: “आपणही यहोवाला काहीतरी देऊ शकतो.”a वेळ असल्यास श्रोत्यांना उल्लेखित शास्त्रवचनांवर टिपणी देण्यास सांगा.

गीत क्र. १६ (१४३)

मार्च १७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ४ (४३)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.

१५ मि: प्रश्‍न पेटी. हा भाग वडिलांनी हाताळावा. संपूर्ण लेख वाचून त्यावर चर्चा करावी.

२० मि: “स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्‍यांना आपण मदत कशी करू शकतो?”b ५ व्या परिच्छेदाची चर्चा करताना, स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्या व्यक्‍तिसोबत बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल याचे संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवावे.

गीत क्र. २३ (२००)

मार्च २४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८ (५३)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, एप्रिल-जून अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

२० मि: “क्षेत्र सेवेत असताना दक्षता बाळगणे.” वडिलांनी या लेखाची श्रोत्यांसोबत चर्चा करावी. लेखातील माहिती स्थानिक परिस्थितीला लागू करून बांधवांना सेवाकार्यात समजदारीने वागण्याचे प्रोत्साहन द्यावे.

१५ मि: आपण शुभवृत्त विदित करतो. एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून, जुलै १, २००५ टेहळणी बुरूज अंकातील, पृष्ठे २०-२१, परि. १०-१४ यातील माहितीवर एक वडील भाषण देतील. पहिल्यांदा राज्य संदेश ऐकला तेव्हा कशा प्रकारे सांत्वन व उमेद मिळाली याविषयी टिपणी करण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा.

गीत क्र. १८ (१६२)

मार्च ३१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१० मि: स्थानीय घोषणा. मार्च महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची प्रचारकांना आठवण करून द्यावी.

२० मि: “नियमन मंडळाकडून पत्र.” भाषण आणि श्रोत्यांसोबत चर्चा.

१५ मि: “क्षेत्र सेवेत असताना एक-दुसऱ्‍याला प्रोत्साहन देणे.”c

गीत क्र. ११ (८५)

एप्रिल ७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १७ (१८७)

सूचना: प्रांतीय अधिवेशनाविषयीच्या माहितीवर एप्रिल ७ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहाच्या आधी चर्चा करू नये. विभागीय पर्यवेक्षक भेट देत असलेली मंडळी वगळता इतर कोणत्याही मंडळीने एप्रिल ७ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहाची सेवा सभा दुसऱ्‍या आठवड्यात हलवू नये. सुचवलेल्या हॉटेल्सची यादी उपलब्ध होताच सूचना फलकावर लावावी. विभागीय संमेलन असल्यामुळे सेवा सभा रद्द करण्यात आल्यास, पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी त्या आठवड्याच्या पुस्तक अभ्यासात अधिवेशनाच्या तारखा व ठिकाण यांविषयी घोषणा करावी. शक्य झाल्यास हॉटेल्सच्या यादीची एकेक प्रत मंडळीच्या प्रत्येक पुस्तक अभ्यास गटाच्या पर्यवेक्षकाला देण्यात यावी. त्या यादीतून, गटातील सदस्य रूम बुकिंग करण्यासाठी हॉटेलचे फोन नंबर लिहून घेऊ शकतात. पण, पर्यवेक्षकांव्यतिरिक्‍त इतर कोणालाही यादीची प्रत देण्यात येऊ नये.

५ मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: काही जण बाप्तिस्मा घ्यायचे का लांबणीवर टाकतात? जुलै १, २००६ टेहळणी बुरूज अंकातील, पृष्ठे ३०-३१, परि. १४-१७ यातील माहितीवर आधारित वडिलांचे भाषण. किशोरवयात बाप्तिस्मा झालेल्या एक किंवा दोन प्रचारकांची संक्षिप्त मुलाखत घ्यावी. कोवळ्या वयात हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यास त्यांना कशामुळे प्रेरणा मिळाली? बाप्तिस्मा घेतल्यामुळे त्यांना आध्यात्मिक प्रौढत्व वाढवण्यास कशा प्रकारे साहाय्य झाले, आणि हे कशा प्रकारे त्यांच्याकरता संरक्षण ठरले आहे?

२५ मि: “२००८ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन.”d मंडळीच्या सचिवांनी हा भाग हाताळावा. पुरवणीवर चर्चा करण्याआधी अधिवेशन नेमणुकीविषयीचे फेब्रुवारी १५, २००७ चे पत्र वाचावे. पुरवणीतील ७ व्या परिच्छेदावर चर्चा करताना, पृष्ठ ४ वर असलेल्या चौकटीतील “हॉटेल बुकिंगसंबंधी सूचना” आणि “हॉटेलचे बुकिंग असे करावे” या शीर्षकांखालील प्रत्येक मुद्दा वाचावा. ज्या शहरात अधिवेशन होणार आहे तेथील बांधवांना हॉटेल्समध्ये राहण्याची गरज नसल्यामुळे अशा मंडळ्यांनी या चौकटीची सविस्तर चर्चा करणे आवश्‍यक नाही. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी लवकरात लवकर तयारीला लागल्याबद्दल सर्वांचे आभार मानावेत.

गीत क्र. २८ (२२४)

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा