सेवा सभा आराखडा
फेब्रुवारी ११ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ८ (५३)
८ मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ १२ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, जानेवारी-मार्च अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.
१५ मि: “आपल्या क्षेत्रातील योग्य लोकांना शोधून काढणे.”a तिसऱ्या परिच्छेदाची चर्चा केल्यानंतर एक प्रात्यक्षिक दाखवा. एक प्रचारक घरमालकासोबत सर्वसामान्य विषयांवर संभाषण सुरू करतो, घरमालकाला खरोखरच आवड आहे किंवा नाही हे तो घरमालकाच्या बोलण्यावरून ताडण्याचा प्रयत्न करतो आणि मग एखादे शास्त्रवचन वाचून दाखवतो.
२२ मि: “सुवार्ता निश्चितार्थाने सांगा.”b (परि. १-१०) सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. पूर्ण वेळ नोकरी करत असतानाही किंवा आजारी असतानाही गेल्यावर्षी साहाय्यक पायनियरींग केलेल्या एक अथवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. ते साहाय्यक पायनियरींग कसे करू शकले? साहाय्यक पायनियरींग करताना त्यांना कोणकोणते आनंददायक अनुभव आले? सातव्या परिच्छेदाची चर्चा करताना मार्च, एप्रिल व मे महिन्यांदरम्यान क्षेत्र सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या सभांच्या व्यवस्थेबद्दल सांगा.
गीत क्र. ९ (३७)
फेब्रुवारी १८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ७ (५१)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१५ मि: स्थानीय गरजा.
२० मि: “सुवार्ता निश्चितार्थाने सांगा.”c (परि. ११-१७) चौदाव्या परिच्छेदाची चर्चा करताना, स्मारकविधीच्या खास आमंत्रणपत्रिका उपलब्ध असल्यास श्रोत्यांना त्याची एक-एक प्रत द्यावी. क्षेत्रात या आमंत्रणपत्रिकेचे वाटप करण्यासाठी मंडळीने कोणत्या योजना केल्या आहेत ते सांगा.
गीत क्र. १७ (१८७)
फेब्रुवारी २५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २६ (२१२)
१० मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना फेब्रुवारी महिन्याचा रिपोर्ट देण्याची आठवण करून द्या. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. सत्यात नसलेल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा एखाद्या शेजाऱ्याला आमंत्रण देण्याकरता स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका कशी द्यायची त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
२० मि: “खंडणी बलिदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण.”d वेळ असल्यास श्रोत्यांना उल्लेखित शास्त्रवचनांवर टिपणी देण्यास सांगा.
१५ मि: नवीन शिष्यांना सेवक होण्यास मदत करा. टेहळणी बुरूज डिसेंबर १, २००५ पृष्ठ ३१ वरील माहितीची एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने चर्चा करा. या अभ्यास लेखातील प्रश्नांचा उपयोग करा. अठराव्या परिच्छेदाची चर्चा केल्यानंतर, एक प्रात्यक्षिक दाखवा, ज्यात एक नवीन प्रचारक एका अनुभवी प्रचारकासोबत घरोघरच्या कार्यात असताना घरमालक नव्या प्रचारकाला प्रश्न विचारतो. नव्या प्रचारकाचे उत्तर इतके प्रभावशाली नसल्यामुळे घरमालक संभाषण थांबवतो. घरातून बाहेर पडल्यानंतर अनुभवी प्रचारक नव्या प्रचारकाने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करतो आणि मग त्याला भविष्यात तो संभाषणाला खीळ घालणाऱ्यांना पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या या पुस्तिकेचा उपयोग करून उत्तर कसे देऊ शकतो, हे दाखवतो.
गीत क्र. ६ (४५)
मार्च ३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २८ (२२४)
१० मि: स्थानीय घोषणा. “स्मारकविधीकरता सूचना,” या पेटीतील मुख्य मुद्द्यांची उजळणी करा.
१५ मि: अधिक गरज असलेल्या ठिकाणी तुम्ही जाऊन सेवा करू शकाल का? टेहळणी बुरूज जुलै १५, २००३, पृष्ठ २० वर आधारित भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा. आमची राज्य सेवा मार्च २००७ पुरवणीच्या पृ. ३, परि. ६ ते पृ. ४ परि. ३ वरील मुद्द्यांचा चर्चेत समावेश करा. अधिक गरज असलेल्या ठिकाणी कोणी सेवा करत असेल तर त्यांची थोडक्यात मुलाखत घ्या. त्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले आणि त्यांनी यावर कशा प्रकारे मात केली? त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले? या देशात, अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करू इच्छिणाऱ्या पात्र जणांची अत्यंत गरज आहे. याबाबतीत प्रार्थनापूर्वक विचार करण्यास बांधवांना प्रोत्साहन द्या. आमची राज्य सेवा याच्या जुलै २००७ च्या अंकातील घोषणा पाहा.
२० मि: “भक्कम विश्वासाचा पुरावा!”e सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. मागच्या सेवा वर्षात मंडळीने साध्य केलेल्या गोष्टींची सकारात्मक उजळणी करून भाग समाप्त करा.
गीत क्र. २० (९३)
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.