वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०७ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००७
आमची राज्य सेवा—२००७
km ११/०७ पृ. ३

घोषणा

▪ साहित्य सादरता नोव्हेंबर: बायबल कथांचं माझं पुस्तक. आपल्याला मुले नाहीत, असे जर लोक म्हणाले तर जागृत राहा! माहितीपत्रक द्यावे. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. याऐवजी तुम्ही यहोवाच्या जवळ या (इंग्रजी) किंवा कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य ही पुस्तकेही सादर करू शकता. जानेवारी: पिवळ्या पडत असलेल्या कागदावर छापलेले अथवा १९९१ सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. जर मंडळीत यांपैकी कोणत्याही पुस्तकांचा साठा नसल्यास, ज्ञान पुस्तक किंवा जागृत राहा! माहितीपत्रक सादर करावे. फेब्रुवारी: तुमच्याविषयी काळजी करणारा निर्माणकर्ता अस्तित्वात आहे का? (इंग्रजी) किंवा कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य.

▪ डिसेंबर महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे हा महिना सहायक पायनियर सेवा करण्याकरता उत्तम ठरेल.

▪ विविध संस्कृतीच्या व धर्माच्या लोकांना साक्ष देण्याकरता तयार करण्यात आलेली अनेक बायबल आधारित प्रकाशने उपलब्ध आहेत. या साहाय्यकारी प्रकाशनांची यादी मंडळीतील लिटरेचर सर्व्हंटकडे असते.

▪ प्रांतीय अधिवेशनांमध्ये व शाखा दफ्तराला जगभरातील कार्यासाठी चेकने दिल्या जाणाऱ्‍या देणग्या, “द वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया”ला देय असल्या पाहिजेत. यासोबत एक पत्र देखील असले पाहिजे, ज्यात देणगी देणाऱ्‍याचे नाव, संपूर्ण पत्ता आणि संस्थेच्या जगभर चाललेल्या कार्यासाठी स्वतःच्या मालमत्तेतून पैसे पाठवण्याचा हेतू हे स्पष्ट लिहिलेले असावे. देणगीची रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा अधिक असेल तर आमच्या ऑडिट रेकॉर्डसाठी कृपया तुमचा इनकम टॅक्स परमनंट अकाऊंट नंबर देखील पाठवावा. हे सर्व कृपया, The Watch Tower Bible and Tract Society of India, 927/1, A V Pura, Post Box 6441, Yelahanka, Bangalore - 560 064, या पत्त्यावर पाठवावे.

▪ प्रचारकांनी आपले डिपीए कार्ड भरले नसेल तर सर्वांनी ते भरून पूर्ण करावे, असे सर्व प्रचारकांना आर्जवले जाते. या डिपीए कार्डमुळे, रक्‍त संक्रमण नाकारण्याचे तुमचे हक्क सुरक्षित राहतात. यासंबंधी कोणाला मदत हवी असेल तर मंडळीचे वडील ती देण्यास तयार आहेत.—आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००६ पुरवणी पाहा.

▪ एका महिन्यात प्रचारकांनी एकापेक्षा अधिक बायबल अभ्यास संचालित केले असतील तर प्रत्येक बायबल अभ्यासासाठी स्टडी रिपोर्ट (S-3) हा फॉर्म भरायची गरज नाही. परंतु, त्यांनी फिल्ड सर्व्हिस रिपोर्ट (S-4) फॉर्म भरताना त्यावर, बायबल अभ्यासांची संख्या लिहिण्याच्या योग्य रकान्यात, जितके बायबल अभ्यास आहेत त्यांची केवळ संख्या लिहावी. S-3 हा फॉर्म, मंडळीच्या सभांच्या उपस्थितीचा रेकॉर्ड ठेवण्यासाठीच केवळ उपयोगात आणला जाईल.

▪ उपलब्ध झालेली नवी प्रकाशने:

वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स २००६ —इंग्रजी

शांतिदायक नवीन जगातील जीवन (पत्रिका क्र. १५) —चीनी, फ्रेंच, पर्शियन, पोर्तुगीज

मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? (पत्रिका क्र. १६) —अरेबिक, चीनी, फ्रेंच, पर्शियन, पोर्तुगीज

नैराश्‍य आलेल्यांना सांत्वन (पत्रिका क्र. २०) —चीनी, फ्रेंच, पर्शियन, पोर्तुगीज

सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार! (पत्रिका क्र. २७) —चीनी, फ्रेंच, पर्शियन, पोर्तुगीज

▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:

चर्चेसाठी बायबल विषय —बंगाली, हिंदी, मराठी, पंजाबी, तेलगू

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा