सेवा सभा आराखडा
ऑक्टोबर ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ४ (४३)
१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ १२ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, ऑक्टोबर १ आणि सावध राहा! ऑक्टोबर-डिसेंबर अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. प्रात्यक्षिकांत कोणतेही एक मासिक सादर करण्यात आले तरीसुद्धा घरमालकाला मासिके देताना दोन्ही मासिके द्यावीत.
२० मि: यहोवाच्या संघटनेला जडून राहा. पुरवणीवर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.
१५ मि: इलेक्ट्रॉनिक युगात मर्यादेने राहणे. (तीत २:११, १३) आमची राज्य सेवा, सप्टेंबर २००२ पृष्ठ ८, परिच्छेद १-७ यावर आधारित भाषण. उपलब्ध वेळानुसार, स्थानिक मंडळीला लागू होत असल्यास, आमची राज्य सेवा नोव्हेंबर १९९९ पुरवणीतील मुद्द्यांचाही समावेश केला जाऊ शकतो.
गीत क्र. २१ (१९१)
ऑक्टोबर १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २६ (२१२)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा.
२० मि: तुम्ही ज्यांना शिकवता त्यांच्यात सत्याचे फळ उत्पन्न होत आहे का? टेहळणी बुरूज ऑगस्ट १५, २००२ अंकातील पृष्ठे १५-२० वरील लेखावर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. विद्यार्थ्याच्या मनातील विचार जाणून घेण्यास आपली मदत करण्याच्या हेतूने बायबल काय शिकवते या पुस्तकाची कशाप्रकारे रचना करण्यात आली आहे याविषयी टिपणी करावी. काही उदाहरणे विचारात घ्यावीत. जसे, अध्याय १, परिच्छेद १९; अध्याय २, परिच्छेद ४; अध्याय ३, परिच्छेद २४; व अध्याय ४, परिच्छेद १८. या पुस्तकाच्या निरनिराळ्या वैशिष्ट्यांचा चांगला उपयोग करण्याचे प्रचारकांना प्रोत्साहन द्यावे.
१५ मि: “नोव्हेंबर महिन्यात सावध राहा! मासिकाच्या खास अंकाची मोहीम!”a सावध राहा! खास अंकातील माहितीची थोडक्यात उजळणी करावी. मग लेखाची प्रश्नोत्तर पद्धतीने चर्चा करावी. तिसरा परिच्छेद विचारात घेताना सावध राहा! ऑक्टोबर-डिसेंबर अंक कसा सादर करायचा याचे पृष्ठ १२ वरील सूचनांच्या आधारावर अथवा तुमच्या क्षेत्रात परिणामकारक असलेल्या इतर सादरतेच्या आधारावर प्रात्यक्षिक दाखवावे. प्रात्यक्षिक संपवण्याआधी पुढच्या भेटीची पार्श्वभूमी तयार करा.
गीत क्र. १८ (१६२)
ऑक्टोबर २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ५ (४६)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ १२ वर दिलेल्या सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता योग्य असलेल्या वेगळ्या सादरतेचा उपयोग करून टेहळणी बुरूज नोव्हेंबर १ व सावध राहा! ऑक्टोबर-डिसेंबर हे अंक कसे सादर करता येतील हे प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवावे.
१५ मि: स्थानीय गरजा.
२० मि: प्रकाशाच्या प्रजेसारखे चालत राहणे. भाषण व मुलाखती. आपण या जगाचा अंधकार सोडून दिला आहे आणि यहोवाच्या प्रकाशात चालण्याचे आपण निवडले आहे. (इफिस. ५:८, ९) यामुळे आपले जीवन सुधारले आहे. आपल्याला जीवनात एक उद्देश लाभला आहे. (१ तीम. ४:८) या प्रकाशाने आपल्याला एक आशा देखील दिली आहे. (रोम. १५:४) दोन किंवा तीन प्रचारकांची मुलाखत घ्या, ज्यांनी यहोवासोबत उत्तम नातेसंबंध जोडण्याकरता व तो टिकवून ठेवण्याकरता मोठ्या अडथळ्यांना तोंड देऊन त्यांवर मात केली. सत्यात येताना त्यांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले? कशी पेलली त्यांनी ही आव्हाने? आज त्यांचे जीवन कशाप्रकारे पूर्वीपेक्षा आनंदी आहे? सत्यात टिकून राहण्यास कोणती गोष्ट त्यांना साहाय्य करते? शेवटी, मंडळीतल्या सर्वांना आध्यात्मिक प्रगती करत राहण्याचे व यहोवाने प्रकट केलेल्या सत्याविषयी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रोत्साहन द्यावे.—२ पेत्र १:५-८.
गीत क्र. २९ (२२२)
ऑक्टोबर २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १३ (१२४)
१० मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना ऑक्टोबर महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी. नोव्हेंबर महिन्याच्या साहित्य सादरतेचा उल्लेख करून त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवावे.
१५ मि: आपल्या निर्माणकर्त्याचे गौरव करण्याकरता आध्यात्मिक ध्येये ठेवा. आमची राज्य सेवा, जून २००६, पृष्ठ ८ यावर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. श्रोत्यांना आपल्या आध्यात्मिक ध्येयांविषयी व ही ध्येये गाठण्याकरता ते सध्या कोणते प्रयत्न करत आहेत हे सांगण्याचे निवेदन करावे. एक किंवा दोन जणांना आधीपासूनच नेमावे.
२० मि: “गोरगरिबांना आशा द्या.”b
गीत क्र. १७ (१८७)
नोव्हेंबर ५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २८ (२२४)
१० मि: स्थानीय घोषणा.
१५ मि: आपल्या मुलांना वळण लावताना यहोवाचे अनुकरण करा. टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, २००१, पृष्ठे ८-१३.
२० मि: “उत्तेजन मिळवणे व देणे.”c प्रवासी पर्यवेक्षकाच्या भेटीमुळे आपल्याला कशाप्रकारे उत्तेजन मिळाले याविषयी काही विशिष्ट टिपणी देण्याचे श्रोत्यांना निवेदन करावे. एक किंवा दोन जणांना आधीपासूनच नेमावे.
गीत क्र. २१ (१९१)
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.