वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०७ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००७
आमची राज्य सेवा—२००७
km ९/०७ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करावा. घरमालकांजवळ आधीपासूनच हे पुस्तक असल्यास, थोडक्यात बायबल अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवून या पुस्तकाचा चांगला उपयोग कसा करता येईल हे त्यांना दाखवावे. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिके. घरमालकाने आस्था दाखवल्यास, तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने चर्चा करावी. नोव्हेंबर: बायबल कथांचं माझं पुस्तक. आपल्याला मुले नाहीत, असे जर लोक म्हणाले तर जागृत राहा! माहितीपत्रक द्यावे. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. याऐवजी तुम्ही यहोवाच्या जवळ या (इंग्रजी) किंवा कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य ही पुस्तकेही सादर करू शकता.

▪ सप्टेंबर महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे हा महिना सहायक पायनियर सेवा करण्याकरता उत्तम ठरू शकेल.

▪ मंडळ्यांनी वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स २००६, व वॉचटावर लायब्ररी—२००७ आवृत्ती (इंग्रजी) ही सीडी-रोम पुढच्या साहित्य मागणीसोबत मागवण्यास सुरुवात करावी. ही सुविधा केवळ मंडळीच्या बाप्तिस्मा घेतलेल्या बांधवांकरता असून ती केवळ मंडळीकडूनच मागवता येईल याची नोंद घ्यावी.

▪ २००८ सालच्या स्मारकविधीच्या काळातील खास जाहीर भाषण मार्च ३१, २००८ च्या सप्ताहादरम्यान दिले जाईल. भाषणाचा विषय नंतर कळवला जाईल. त्या रविवारी ज्या मंडळ्यांमध्ये विभागीय पर्यवेक्षकांची भेट किंवा संमेलन असल्यास जाहीर भाषण पुढील आठवडी दिले जाईल. मार्च ३१ च्या सप्ताहाआधी कोणत्याही मंडळीत हे खास जाहीर भाषण दिले जाऊ नये.

▪ जानेवारी २००८ पासून बंगाली, मराठी, नेपाळी व तेलगू या भाषांतून सावध राहा! प्रकाशित केले जाणार नाही. कन्‍नड, गुजराती, तामीळ, पंजाबी, मल्याळम व हिंदी भाषेत ते त्रैमासिकाच्या रूपात प्रकाशित केले जाईल.

▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने जून, जुलै व ऑगस्ट महिन्याचा मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. हिशेब तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.—इंस्ट्रक्शन्स फॉर काँग्रिगेशन अकाउंटिंग (S-27) यातील माहिती पडताळून पाहावी.

▪ ज्या मंडळ्यांमध्ये ट्रस्ट आहेत त्यांनी नियुक्‍त तारखेआधी ॲन्युअल जनरल मिटींग घ्यावी. या मिटींगची टिपणे एका खास वहीत व्यवस्थित नोंदली जावीत. ट्रस्टचा जमाखर्च एका चार्टर्ड अकाऊंटंटकडून तपासून घेणे चांगले राहील. तपासलेल्या जमाखर्च अहवालाची एक प्रत शाखा दप्तराला पाठवली जावी. ट्रस्टच्या कारभाराकरता खर्च करण्याअगोदर जर २००६-२००७ आर्थिक वर्षाकरता एकूण प्राप्ती १,००,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयकर विभागाला प्राप्तीचा अहवाल सादर करणे आवश्‍यक आहे. तसेच, १९६१ साली निघालेल्या आयकर कायद्याच्या कलम १२अ नुसार मंडळीच्या ट्रस्टची नोंदणी झाली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला आयकर अहवाल तयार करण्याविषयी व कलम १२अ नुसार नोंदणी करण्याविषयी साहाय्य करू शकेल.

▪ उपलब्ध झालेली नवी प्रकाशने:

यहोवाचे गुणगान गा (२९ गीते) —गुजराती

तुम्हाला बायबलविषयी जास्त माहिती घेण्यास आवडेल का? (पत्रिका क्र. २६) —कोंकणी (देवनागरी)

▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:

थोर शिक्षकापासून शिका —तामीळ

कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य —कन्‍नड, नेपाळी, पंजाबी, मल्याळम, हिंदी

तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे —इंग्रजी, नेपाळी, तामीळ, हिंदी

वक्‍तृत्त्व व शिकवण्याच्या कलेत उन्‍नती करणे —नेपाळी

‘जाऊन, शिष्य बनवा व त्यांना बाप्तिस्मा द्या’ —बंगाली

यहोवाचे गुणगान गा (२९ गीते) —नेपाळी

दुःखाचा कधी अंत होईल का? (पत्रिका क्र. ७५) —आसामी, इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तामीळ, तेलगू, पंजाबी, मराठी, मल्याळम, हिंदी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा