घोषणा
▪ साहित्य सादरता जुलै व ऑगस्ट: खालीलपैकी कोणतेही ३२-पानी माहितीपत्रक द्यावे. देव खरोखरी आपली काळजी करतो का?, जागृत राहा!, तुम्ही त्रैक्य मानावे का?, नंदनवन आणविणारे सरकार, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? आणि तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी). सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करावा. घरमालकांजवळ आधीपासूनच हे पुस्तक असल्यास, थोडक्यात बायबल अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवून या पुस्तकाचा चांगला उपयोग कसा करता येईल हे त्यांना दाखवावे. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिके. घरमालकाने आस्था दाखवल्यास, तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने चर्चा करावी.
▪ सप्टेंबर महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे हा महिना सहायक पायनियर सेवा करण्याकरता उत्तम ठरू शकेल.
▪ सप्टेंबरपासून विभागीय पर्यवेक्षकांच्या जाहीर भाषणाचा विषय, “बायबल विश्वसनीय असल्याचे कोणते पुरावे आहेत?” हा असेल.
▪ आम्ही असे सुचवू इच्छितो की सामान्य पायनियर सेवेकरता केलेले अर्ज, विनंती केलेल्या तारखेच्या कमीतकमी ३० दिवसांआधी शाखा दफ्तराला सादर केले जावेत. अर्ज पाठवण्याआधी मंडळीच्या सचिवांनी, ते पूर्णपणे भरले आहेत की नाही याची खात्री करावी. जर अर्जदारांना बाप्तिस्म्याची नेमकी तारीख आठवत नसेल, तर त्यांनी अंदाजे तारीख भरावी आणि या तारखेची नोंद करून ठेवावी. सचिवांनीही या तारखेची मंडळीचे प्रचारक अहवाल कार्ड (S-21) यावर नोंद करावी.
▪ आध्यात्मिक पात्रता असणारे प्रचारक व पायनियर आपल्या शहराच्या जवळपास किंवा इतर ठिकाणी, क्वचितच कार्य केलेल्या क्षेत्रात जाऊन राहण्याच्या व प्रचार करण्याच्या स्थितीत असतील व असे करण्यास इच्छुक असतील तर त्यांनी आपल्या विभागीय पर्यवेक्षकाशी व मंडळीच्या सेवा समितीशी याविषयी चर्चा करावी. जर अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या व्यक्ती आध्यात्मिकरित्या सुयोग्य असतील तर सेवा समिती याविषयी शाखा दप्तराला लिहून कळवेल. (km-MR ३/०७ पृ. ३, परि. ६ ते पृ. ४, परि. ३ पाहा.)
▪ ऑगस्ट ३१, २००७ किंवा त्यानंतर लवकरात लवकर साहित्य व मासिकांची वार्षिक मोजणी केली जावी. ही वार्षिक मोजणी दर महिन्यात लिटरेचर कोऑर्डिनेटर जी मोजणी करतात त्यासारखीच आहे. एकूण संख्या लिटरेचर इन्व्हेन्टरी (S-18) फॉर्मवर भरावी. मासिकांची एकूण संख्या, मॅगझीन सर्व्हंट सांगू शकतील. कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सचिवांनी इन्व्हेन्टरीची तपासणी करावी. त्यांनी व कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी फॉर्मवर सह्या कराव्यात. प्रत्येक कोऑर्डिनेटिंग मंडळीला तीन लिटरेचर इन्व्हेन्टरीचे (S-18) फॉर्म्स मिळतील. मूळ फॉर्म भरून कृपया सप्टेंबर ६ तारखेच्या आत शाखा दफ्तराला पाठवावा. फॉर्मची कार्बन प्रत मंडळीच्या फाईलसाठी ठेवावी. तिसरी प्रत हिशेबासाठी वापरू शकता.
▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:
जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? —इंग्रजी, कन्नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, बंगाली, मराठी, मल्याळम, हिन्दी