वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०७ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००७
  • उपशिर्षक
  • जून ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून २५ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै २ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००७
km ६/०७ पृ. २

सेवा सभा आराखडा

जून ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज जून १ आणि सावध राहा! एप्रिल - जून अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

१५ मि: “देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने पूर्णपणे सुसज्ज.” टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५, २००२ अंकातील पृष्ठे २४-८ वरील लेखावर आधारित भाषण. काही ख्रिस्ती आस्था व्यक्‍त करणाऱ्‍या लोकांना बायबल अभ्यासाविषयी सांगण्यास मागेपुढे पाहतात कारण आपण अभ्यास घेऊ शकणार नाही असे त्यांना वाटते. पण यहोवा आपल्याला त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे व त्याच्या संघटनेद्वारे या कार्याकरता योग्य बनवतो. आपण फक्‍त घरमालकांना पुस्तके व मासिके देऊ इच्छित नाही. आपण लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (मत्त. २८:१९, २०) बायबल अभ्यास सुरू करण्याचे ध्येय नेहमी डोळ्यापुढे ठेवण्याचे प्रचारकांना प्रोत्साहन द्यावे.

२० मि: “जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.” पुरवणीवर आधारित भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा.

गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

जून १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा.

१५ मि: “बहुभाषिक पत्रिकांचा संच.” श्रोत्यांसोबत चर्चा. बहुभाषिक पत्रिका संच तयार करण्याकरता तुमच्या क्षेत्राकरता सुचवलेल्या पत्रिकांविषयी मंडळीला माहिती द्यावी. हा संच नेहमी आपल्याजवळ बाळगण्याचे प्रचारकांना प्रोत्साहन द्यावे.

२० मि: “आम्ही यहोवाच्या सेवेकरता खपण्यास तयार आहोत!”a वेळ असल्यास श्रोत्यांना उल्लेखित शास्त्रवचनांवर टिप्पणी देण्याचे निवेदन करावे.

गीत क्र. १० (८२) आणि समाप्तीची प्रार्थना.

जून २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २ (१५)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज जुलै १ आणि सावध राहा! जुलै - सप्टेंबर अंक कसे सादर करावेत त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

१५ मि: स्थानीय गरजा.

२० मि: “‘मोठ्या व कार्य साधण्याजोग्या द्वारातून’ तुम्ही प्रवेश करणार का?”b एक किंवा दोन सामान्य पायनियरांची संक्षिप्त मुलाखत घ्यावी. सामान्य पायनियर सेवा करण्याकरता त्यांना कोणकोणते बदल करावे लागले? त्यांना असे केल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?

गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै २ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८ (५३)

१० मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना जून महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी. जुलै महिन्यात आपण कोणते साहित्य सादर करणार आहोत याचा उल्लेख करावा आणि ते कसे सादर करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

१५ मि: अनौपचारिक साक्षकार्य—सुवार्तेची घोषणा करण्याची एक महत्त्वाची पद्धत. आमची राज्य सेवा जानेवारी २००७ अंकातील पृष्ठ ६ वरील “अनौपचारिक साक्षकार्य” या उपशीर्षकाखालील माहितीवर आधारित श्रोत्यांसोबत चर्चा. अनौपचारिक साक्षकार्य करण्याचे काही व्यवहारोपयोगी मार्ग सुचवावेत. अनौपचारिक साक्षकार्य करताना आलेले चांगले अनुभव सांगण्यास श्रोत्यांना निवेदन करावे.

२० मि: “विपुल फळ देत राहा.”c परिच्छेद ४ वर चर्चा करताना, टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, २००३ अंकातील पृष्ठ २१ वरील “‘धीराने फळ देत राहणे’” या चौकटीतील मुद्द्‌यांचा समावेश करावा.

गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा