वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०७ पृ. ११
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००७
आमची राज्य सेवा—२००७
km ४/०७ पृ. ११

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

एप्रिल ३०, २००७ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, मार्च ५, ते एप्रिल ३०, २००७ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्‍नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]

भाषणाचे गुण

१. आपल्या भाषणाची रूपरेषा आपण साधी कशी ठेवू शकतो? [be पृ. १६८ परि. ४]

२. भाषणातील माहिती तर्कशुद्ध पद्धतीने सादर करण्याचे चार मार्ग कोणते? [be पृ. १७० परि. ३-पृ. १७२ परि. ४]

३. भाषणात कोणत्या मुद्द्‌यांचा समावेश करावा हे ठरवताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? [be पृ. १७३ परि. १-२]

४. संपूर्ण भाषण लिहून न काढता आयत्या वेळी विचार करून बोलण्याचे कोणते फायदे आहेत? [be पृ. १७५ परि. २-४]

५. संभाषणाच्या शैलीत बोलणे महत्त्वाचे का आहे आणि हा गुण आपल्याला कशाप्रकारे विकसित करता येईल? [be पृ. १७९ परि. ४, चौकोन; पृ. १८०, चौकोन]

नेमणूक क्र. १

६. सप्ताहाच्या बायबल वाचनातून ठळक मुद्दे सादर करण्याच्या नेमणुकीकरता एक बंधू कशाप्रकारे तयारी करू शकतो? [be पृ. ४७ परि. ३-४]

७. ख्रिस्ताच्या खंडणीमुळे आपल्याला जे फायदे मिळतात त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे काय आहे? [w०५ ११/१ पृ. १४ परि. १]

८. जाहीर भाषणाच्या रुपरेषेत दिलेल्या शास्त्रवचनांच्या संदर्भांचा कशाप्रकारे उपयोग केला जावा? [be पृ. ५३ परि. १-२]

९. एक शिक्षक या नात्याने येशूचे ध्येय काय होते आणि आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो? [be पृ. ५७ परि. १]

१०. शिकवताना दोन विरोधात्मक गोष्टी श्रोत्यांपुढे मांडणे का परिणामकारक असते? [be पृ. ५७ परि. ३-४]

साप्ताहिक बायबल वाचन

११. यिर्मया ६:१६ यात सांगितल्याप्रमाणे, “पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला” या सल्ल्याचे पालन आपण कसे करू शकतो?

१२. अविश्‍वासू यहुदी लोकांना बोध देताना वस्तुपाठ म्हणून करकोचीचे उदाहरण का निवडले आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळते? (यिर्म. ८:७)

१३. यिर्मया १५:१७ यातील माहितीचा करमणुकीसंबंधी आपल्या दृष्टिकोनाशी काय संबंध आहे?

१४. मानव महान कुंभार, यहोवा याच्या हातातील मातीसारखे आहेत असे का म्हणता येते? (यिर्म. १८:५-११)

१५. यिर्मया २५:१७-२६ यात राष्ट्रांची नावे ज्या क्रमाने दिली आहेत ते आज आपल्या काळात महत्त्वाचे का आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा