घोषणा
▪ साहित्य सादरता फेब्रुवारी: यहोवाच्या जवळ या (इंग्रजी) हे पुस्तक सादर केले जाईल. जर हे पुस्तक उपलब्ध नसेल तर प्रकटीकरणाचा कळस किंवा ज्याचा ज्यादा साठा आहे असे जुने प्रकाशन सादर करावे. मार्च: बायबल काय शिकवते हे पुस्तक सादर करावे आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करावा. बायबल काय शिकवते पुस्तकासोबत तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्यावी. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिकांच्या प्रती. आवड दाखवणाऱ्या व्यक्तींची, किंवा स्मारकविधी व इतर विशेष सभांना उपस्थित राहणाऱ्या पण मंडळीसोबत सक्रिय नसणाऱ्या व्यक्तींची पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते हे पुस्तक देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.
▪ मंडळीच्या सचिवांनी व सेवा पर्यवेक्षकांनी सर्व सामान्य पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. जर कोणाला तास भरण्याच्या संबंधाने अडचण असेल तर वडिलांनी त्यांना मदत पुरवण्याची व्यवस्था करावी. आणखी सूचना हव्या असतील तर, वार्षिक S-201 पत्रांची उजळणी करावी.
▪ २००७ सालच्या स्मारकविधी काळातल्या खास जाहीर भाषणाचा विषय, “समस्यांनी भरलेल्या या जगातही तुम्ही सुरक्षितता अनुभवू शकता!” असा आहे. अशीच एक घोषणा आमची राज्य सेवा ऑक्टोबर २००६ अंकात आली आहे.
▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:
यहोवाचे गुणगान करा—फक्त गीतांचे बोल —तमिळ
फक्त गीतांचे बोल (Ssbly) असलेले गीत पुस्तक लहान आकाराचे असून त्यात म्युझिकल नोट्स नाहीत.
तुमच्यामध्ये अमर आत्मा आहे का? —उर्दू
▪ अमेरिकन संकेत भाषेत उपलब्ध असलेल्या नव्या डीव्हीडी:
मार्कचे शुभवर्तमान
तुम्ही कोणाचा अधिकार मानता?
▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:
सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य —इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी
देव खरोखरी आपली काळजी करतो का? —इंग्रजी, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी, मल्याळम, हिंदी.
भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! —तिबेटी