वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०७ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००७
  • उपशिर्षक
  • फेब्रुवारी १२ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी १९ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी २६ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च ५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००७
km २/०७ पृ. २

सेवा सभा आराखडा

फेब्रुवारी १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ १२ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज फेब्रुवारी १ आणि सावध राहा! जानेवारी ते मार्च अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात ‘मला धर्मामध्ये आस्था नाही’ असे म्हणून संभाषणाला खीळ घालू पाहणाऱ्‍याला कसे उत्तर देता येईल हे दाखवावे.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पृ. ९ पाहावे.

३५ मि: “सर्वदूर यहोवाचे गुण प्रसिद्ध करा.”a सेवा पर्यवेक्षकाने हा भाग हाताळावा. चर्चेदरम्यान स्मारकविधीचा वेळ व ठिकाण याविषयी केव्हा सांगायचे ते ठरवावे. तसेच क्षेत्र सेवेकरता आयोजित केलेल्या अतिरिक्‍त सभांविषयी तसेच एप्रिल महिन्यात मंडळीने किती सहायक पायनियरांचे ध्येय ठेवले आहे हे ही सांगावे.

गीत क्र. २६ (२१२) आणि समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी १९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ११ (८५)

५ मि: स्थानीय घोषणा.

२० मि: “बायबल काय शिकवते या पुस्तकातून शिकवताना थोर शिक्षकाचे अनुकरण करा.”b ६ वा परिच्छेद विचारात घेताना, एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवावे, ज्यात प्रचारक बायबल काय शिकवते या पुस्तकातील ६ व्या अध्यायाच्या शेवटी दिलेल्या रकान्याच्या साहाय्याने विद्यार्थ्यासोबत त्या अध्यायाची उजळणी करत आहे.

२० मि: मार्च महिन्यात तुम्ही एक बायबल अभ्यास सुरू करू शकता का? श्रोत्यांसोबत चर्चा. मार्च महिन्याच्या पूर्वार्धात आपण बायबल काय शिकवते हे पुस्तक सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करणार आहोत. आमची राज्य सेवा जानेवारी २००६ अंकातील पुरवणीतून, पृष्ठे ३-६ यातील सूचनांची उजळणी करावी. पृष्ठ ६ वरील सूचनांचा उपयोग करून तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणारी आणखी एक सादरता दाखवावी आणि पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल हे प्रात्यक्षिकात दाखवावे. या पुस्तकातून शिकवताना आलेल्या उल्लेखनीय अनुभवांविषयी सांगण्याचे, विशेषतः बायबल अभ्यास सुरू करण्यात कशाप्रकारे यश आले याविषयी सांगण्याचे श्रोत्यांना निवेदन करावे.

गीत क्र. २९ (२२२) आणि समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १८ (१६२)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ १२ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज फेब्रुवारी १ आणि सावध राहा! जानेवारी ते मार्च अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात प्रचारक व्यापार क्षेत्रात कार्य करत असल्याचे दाखवावे.

१५ मि: “अक्रियाशील झालेल्यांना विसरू नका.”c टेहळणी बुरूज मे १, २००४ अंकातील पृष्ठे २१-२, परिच्छेद १३-१६ यातील टिपण्यांचा समावेश करावा.

२० मि: “आपल्या सेवाकार्यात ख्रिस्ताचे अनुकरण करा.”d उपलब्ध असलेल्या वेळानुसार श्रोत्यांना उल्लेखलेली शास्त्रवचने वाचून त्यांवर अभिप्राय देण्याची विनंती करावी.

गीत क्र. १५ (१२७) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ३ (३२)

१५ मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. स्मारकविधीच्या विशेष निमंत्रणपत्रिकेची एकेक प्रत श्रोत्यांपैकी प्रत्येकाला द्यावी आणि मंडळीच्या क्षेत्रात ही निमंत्रणपत्रिका वितरीत करण्यासाठी ज्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत त्यांविषयी सांगावे. सर्वांना या कार्यात पुरेपूर सहभाग घेण्याचे प्रोत्साहन द्यावे. निमंत्रणपत्रिकेचा कशाप्रकारे उपयोग केला जावा हे एका प्रात्यक्षिकाद्वारे दाखवावे.

१५ मि: सुव्यवस्थितपणे सुवार्तेचा प्रचार करणे. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता सुसंघटित यातील पृष्ठ १०२ ते अध्यायाच्या शेवटापर्यंत असलेल्या माहितीच्या आधारावर भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.

१५ मि: “आपल्या स्वाधीन केलेली संपत्ती.”e उपलब्ध असलेल्या वेळानुसार श्रोत्यांना उल्लेखित शास्त्रवचनांवर अभिप्राय मांडण्याची विनंती करावी.

गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा