सर्वश्रेष्ठ प्रतीचा वैद्यकीय उपचार—म्हणजे नेमके काय?
“ज्या रुग्णाचा रक्ताविना औषधोपचार करण्यात आला आहे त्याला सर्वश्रेष्ठ प्रतीची चिकित्सा मिळाली आहे असे म्हणता येईल.” हे आहेत मेडिकल डायरेक्टर व अनेस्थेशियोलॉजिस्ट डॉ. मायकल रोझ यांचे शब्द. “रक्ताविना” केलेल्या औषधोपचारांत कोणत्या प्रक्रिया व संक्रमणाऐवजी दिली जाणारी औषधे समाविष्ट आहेत? वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियांसंबंधी जाणीवपूर्वक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला याविषयी माहिती असणे महत्त्वाचे आहे. नो ब्लड—मेडिसिन मीट्स द चॅलेंज हा व्हिडिओ पाहा. त्यानंतर तुम्हाला त्यातील माहिती नीट समजली की नाही हे तपासून पाहण्याकरता खालील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.—सूचना: या व्हिडिओपटात अगदी थोड्या अवधीची शस्त्रक्रियेची काही दृश्ये आहेत. तेव्हा आपल्या लहान मुलांना हा व्हिडिओ पाहू द्यावा किंवा नाही याविषयी पालकांनी ठरवावे.
(१) यहोवाचे साक्षीदार रक्त संक्रमण स्वीकारत नाहीत यामागचे सर्वात प्रमुख कारण कोणते? (२) वैद्यकीय औषधोपचारांच्या बाबतीत यहोवाच्या साक्षीदारांची काय इच्छा आहे? (३) रुग्णांना कोणता मूलभूत अधिकार आहे? (४) रक्त संक्रमणाऐवजी इतर पर्याय निवडणे हे एक योग्य व जबाबदार कृत्य का आहे? (५) रुग्णाच्या शरीरातून बरेच रक्त गेल्यास, डॉक्टरांनी ताबडतोब कोणते दोन उपाय करणे गरजेचे आहे? (६) रक्ताविना केलेला उपचार कोणत्या चार तत्त्वांवर आधारित आहे? (७) डॉक्टर पुढील ध्येये कशाप्रकारे साध्य करू शकतात: (क) शरीरातून जाणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी करणे, (ख) शरीरातल्या लाल रक्त पेशींचे रक्षण करणे, (ग) शरीरात रक्त उत्पन्न करण्याच्या नैसर्गिक क्रियेला चालना देणे, (घ) शरीरातून गेलेल्या रक्ताची कमी भरून काढणे? (८) (क) हिमोडायल्युशन व (ख) सेल सॅल्व्हेज या प्रक्रियांचे वर्णन करा. (९) संक्रमणाऐवजी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही उपाययोजनेसंबंधी तुम्ही काय जाणून घेतले पाहिजे? (१०) गंभीर स्वरूपाच्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रक्त संक्रमणाशिवाय करणे शक्य आहे का? (११) वैद्यकीय क्षेत्रात कोणते सकारात्मक बदल घडून येत आहेत?
या व्हिडिओपटात दाखवलेले काही उपचार स्वीकारणे अथवा न स्वीकारणे हा प्रत्येकाच्या बायबलनुसार प्रशिक्षित केलेल्या विवेकावर अवलंबून असलेला वैयक्तिक निर्णय आहे. संक्रमणाऐवजी वापरल्या जाणाऱ्या कोणत्या उपाययोजना तुम्ही स्वतःकरता व आपल्या मुलांकरता स्वीकाराल हे तुम्ही ठरवले आहे का? तुमच्या कुटुंबातील साक्षीदार नसलेल्या सदस्यांनाही तुम्ही आपल्या निर्णयांविषयी व त्यांमागील कारणांविषयी स्पष्टपणे सांगितले पाहिजे.—टेहळणी बुरूज जून १५, २००४ आणि ऑक्टोबर १५, २००० अंकांतील “वाचकांचे प्रश्न” हा लेख पाहावा.