वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०७ पृ. १
  • प्रेम—फलदायी सेवाकार्याचे गुपीत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रेम—फलदायी सेवाकार्याचे गुपीत
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याचा अर्थ काय?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • प्रेमळपणे शिकवण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • तुमच्यावर प्रीती करणाऱ्‍या देवावर प्रेम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • “कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने” प्रेम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km १/०७ पृ. १

प्रेम—फलदायी सेवाकार्याचे गुपीत

१ “माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” (मत्त. ११:२८) या सांत्वनदायक शब्दांतून येशूला लोकांबद्दल असलेले मनस्वी प्रेम व्यक्‍त होते. पण आजच्या जगात प्रेम जणू नाहीसे झाले आहे. आणि अशा या जगात राहून लोक अक्षरशः थकून गेले आहेत. ख्रिस्ती सेवक या नात्याने आपण या लोकांबद्दल प्रेम व्यक्‍त करण्याद्वारे येशूचे अनुकरण करू इच्छितो. सुवार्तेचा प्रचार करत असताना आपल्याला हे कसे करता येईल?

२ आपल्या शब्दांतून: लोकांबद्दल असलेल्या प्रेमामुळेच येशू सुवार्ता सांगण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्यास प्रवृत्त झाला. (योहा. ४:७-१४) आपल्याला जर लोकांबद्दल प्रेम असेल तर अनौपचारिकरित्या साक्ष देण्याबद्दल वाटणाऱ्‍या संकोचावर आपण मात करू शकू. सहा वर्षांच्या एका चिमुकलीने दवाखान्यातील प्रतिक्षालयात तिच्या शेजारी बसलेल्या एका स्त्रीला साक्ष दिली. कशामुळे ती असे करण्यास प्रवृत्त झाली? ती सांगते, “या स्त्रीला पाहूनच मला असं वाटलं की हिला यहोवाबद्दल जाणून घेण्याची गरज आहे.”

३ आपल्याला लोकांबद्दल आस्था आहे हे आपण त्यांच्याशी प्रामाणिकपणे, प्रेमळपणे व मैत्रिपूर्ण पद्धतीने बोलण्याद्वारे दाखवू शकतो. इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्याद्वारे, त्यांच्या काळज्या व विवंचना समजून घेण्याद्वारे आणि मनःपूर्वक वैयक्‍तिक आस्था व्यक्‍त करण्याद्वारेही आपण लोकांबद्दल प्रेम असल्याचे दाखवतो. (नीति. १५:२३) येशूचे अनुकरण करून आपण राज्याच्या संदेशाच्या सकारात्मक पैलूवर आणि यहोवाला लोकांबद्दल वाटणाऱ्‍या ममतेवर व करुणेवर भर दिला पाहिजे.—मत्त. २४:१४; लूक ४:१८.

४ कृतींतून: येशूने लोकांच्या गरजांची आपल्याला जाणीव आहे हे व्यावहारिक मार्गांनी अर्थात आपल्या कृतींतून दाखवले. (मत्त. १५:३२) आपल्यालाही सेवाकार्यात सहभाग घेताना प्रेमळपणा व दयाळूपणा दाखवण्याची संधी मिळू शकते. एका बहिणीला एकदा एक स्त्री भेटली. ही स्त्री फोनवर काहीतरी महत्त्वाचे बोलत होती, पण दुसरीकडून बोलणारी व्यक्‍ती नेमके काय म्हणतेय हे तिला नीट समजत नव्हते. तेव्हा बहिणीने ती व्यक्‍ती काय सांगू इच्छिते हे त्या स्त्रीला अनुवाद करून सांगितले. या प्रेमळ कृत्याचे पर्यवसान बायबलवर आधारित चर्चेत झाले आणि ती स्त्री बायबल अभ्यास करण्यास तयार झाली. दुसऱ्‍या उदाहरणात, पुनर्भेट करायला गेलेल्या एका बांधवाला, घरमालक अगदी वैतागलेल्या स्थितीत आढळला. कारण तो एक मोठा सोफा घरात नेण्याचा प्रयत्न करत होता आणि सोफा दारातच अडकला होता. बांधवाने त्या माणसाला सोफा घरात न्यायला मदत केली. आणि काही वेळानंतर तो त्याच सोफ्यावर बसून, खुष झालेल्या घरमालकासोबत बायबल अभ्यास सुरू करू शकला.

५ सेवाकार्यात सहभाग घेताना आपण देवाबद्दल आणि आपल्या शेजाऱ्‍यांबद्दल प्रेम व्यक्‍त करतो. (मत्त. २२:३६-४०) शब्दांतून व कृतींतून हे प्रेम व्यक्‍त केल्यामुळे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना आपल्याजवळ सत्य असल्याची खात्री पटण्यास मदत होते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा