प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकात करावयाचे काही फेरबदल
प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या १९८८ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात काही महत्त्वाचे फेरबदल करण्यात येत आहेत. हे फेरबदल खालीलप्रमाणे आहेत. या यादीत आकडेवारीत काही फरक करण्यात आलेला नाही. वार्षिक पुस्तक व अलीकडच्या इतर प्रकाशनांत तुम्हाला अद्ययावत आकडे सापडू शकतील.
अध्याय ४
पृ. १९, परि. ४, शेवटले शास्त्रवचन गाळावे: मत्तय २५:३१-३३.
अध्याय ५
पृ. २४, परि. ३, तळटीप पुढीलप्रमाणे बदलावी: * सविस्तर माहितीसाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील पृष्ठे ८८-९२, २१५-१८ पाहावीत.
अध्याय ६
पृ. ३०, परि. १२, सहाव्या वाक्यात पुढीलप्रमाणे बदल करावा: सरतेशेवटी, रोमी सम्राट कॉन्स्टंटाईन याने “ख्रिस्ती” धर्माला अधिकृत संमती दिली व यामुळे ख्रिस्ती धर्मजगत उदयास आले, जेथे चर्च व राज्य यांनी एकत्रपणे हजार वर्षे राज्यकारभार चालविला.
पृ. ३२, चौकट, पहिला परिच्छेद गाळून पुढील मजकूर घालावा: सा.यु. २९ च्या साधारण ऑक्टोबर महिन्यात येशूचा यार्देन नदीत बाप्तिस्मा झाला, तेव्हा त्याला नेमस्त राजा या नात्याने अभिषिक्त करण्यात आले. याच्या साडेतीन वर्षानंतर, सा.यु. ३३ मध्ये तो यरुशलेम मंदिरात आला व तिला लुटारूंची गुहा करणाऱ्या लोकांना त्याने बाहेर हाकून लावले. अशाच प्रकारची समांतरता, येशू ऑक्टोबर १९१४ मध्ये स्वर्गात सिंहासनाधिष्ट झाल्यावर साडेतीन वर्षांनी जेव्हा खिस्ती असल्याचा दावा करणाऱ्यांचा न्याय करण्यासाठी देवाच्या घरापासून सुरवात झाली, तेव्हा दिसून येते. (मत्तय २१:१२, १३; १ पेत्र ४:१७) १९१८ च्या सुरवातीस यहोवाच्या लोकांच्या राज्य हालचालीला मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले. तो पृथ्वीभरात परीक्षेचा काळ होता आणि भ्याड लोकांना त्यातून चाळून काढण्यात आले. मे १९१८ मध्ये ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मपुढाऱ्यांनी वॉचटावर सोसायटीच्या अधिकाऱ्यांना कारागृहात टाकण्याची चिथावणी दिली पण नऊ महिन्यांनी त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांना त्यांच्यावरील खोट्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविण्यात आले. परीक्षा व शुद्धिकरण घडल्यामुळे देवाच्या लोकांची संघटना, १९१९ पासून पुढे, ख्रिस्ताद्वारे यहोवाचे राज्य मानवजातीसाठी एकमेव आशा आहे हे घोषित करण्यास आवेशाने पुढे सरसावली.—मलाखी ३:१-३.
अध्याय ८
पृ. ४०, परि. ८, २ ऱ्या ओळीत, “१२५ चुका” याऐवजी: १३० चुका असे घालावे
पृ. ४०, परि. १०, शेवटचे वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: केवळ अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात यहोवाच्या साक्षीदारांनी ५० अनुकूल निर्णय जिंकले आहेत.
अध्याय १०
पृ. ५०, परि. ११, तळटीप पुढीलप्रमाणे बदलावी: * उदाहरणार्थ, टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, २००३ या अंकातील “विश्वासू ख्रिस्ती स्त्रिया—देवाचे अनमोल उपासक” हा लेख पाहावा.
अध्याय ११
पृ. ५६, परि. ९, परिच्छेदाचा अर्धा भाग पुढीलप्रमाणे बदलावा: या बाबतीत वॉचटावर नियतकालिकाने “आपली प्रतीति पाहा” तसेच “स्वतःकरता जगण्याचे सोडून देणे” अशा विषयांची चर्चा करून उत्तेजन दिले आहे.* अशी ही शास्त्रवचनीय मदत मिळालेली असताना, आपण आपल्या अंतर्यामाचे परीक्षण करू या व यहोवासमोर सचोटी राखून नम्रपणे व प्रार्थनाशीलपणे चालू या.—स्तोत्र २६:१-३; १३९:२३, २४.
पृ. ५६, परि. ९, तळटीप पुढीलप्रमाणे बदलावी: * कृपया टेहळणी बुरूजचे, ऑगस्ट १, २००५ व एप्रिल १, २००५ हे अंक पाहावेत.
अध्याय १२
पृ. ६१, परि. १४, तळटीप पुढीलप्रमाणे बदलावी: # योहान वर्गाद्वारे प्रकाशित होणाऱ्या द वॉचटावर या नियतकालिकाने प्रचारकार्यात शक्य आहे तितक्या अधिक प्रमाणात सहभागी होण्याची संधी साधून घेण्याची निकड सतत मांडली आहे. उदाहरणार्थ, जानेवारी १, २००४ च्या अंकातील “यहोवाचे गौरव करा” व “त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर पोहंचला” हे लेख बघा. जून १, २००४ च्या अंकातील “देवाच्या नावाचा महिमा गाणारे धन्य!” या लेखात पूर्ण वेळेच्या ‘उघड्या द्वारातून’ आत शिरण्यावर अधिक भर देण्यात आली होती. २००५ च्या कार्यवर्षात एका महिन्यात १०,९३,५५२ पायनियरांचा उच्चांक गाठण्यात आला.
अध्याय १३
पृ. ६९, परि. ११, शेवटले वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: साधारण ४० वर्षांच्या आधीच त्यांनी १९१४ कडे बायबल भविष्यवादात चिन्हीत करण्यात आलेल्या विदेश्यांच्या काळाची समाप्ती होणारे वर्ष व सोबत पृथ्वीवर आश्चर्यावह घटना घडण्याचा काळ असा निर्देश केला.—प्रकटीकरण १:१०.
पृ. ७१, परि. १४, १ ल्या ओळीत, “१९९३ मध्ये याची एकंदर छपाई २ कोटी ९० लाखांच्याही” याऐवजी: २००६ मध्ये याची एकंदर छपाई ५ कोटी ९० लाखांच्याही असे घालावे
पृ. ७३, परि. २३, ९ व्या व १० व्या ओळींत असलेले मत्तय २५:३१ हे शास्त्रवचन गाळावे
अध्याय १६
पृ. ९०, परि. ४, दुसरी तळटीप पुढीलप्रमाणे बदलावी: * येशू १९१४ मध्ये आपल्या राज्यात आला, याबद्दलच्या सविस्तर पुराव्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील पृष्ठे २१५-१८ पाहावीत.
पृ. ९०, परि. ६, परिच्छेद पुढीलप्रमाणे बदलावा: नव्यानेच मुकुटमंडित झालेला हा राजा युद्धास पुढे का सरसावला पाहिजे? कारण यहोवाचा आद्य शत्रू दियाबल सैतान, तसेच पृथ्वीवर त्याच्या हेतूंची हेतुपुरस्सर किंवा अजाणतेत सेवा करणाऱ्या लोकांच्या कट्टर विरोधात त्याचे राजत्व प्रस्थापित झाले आहे. राज्याचा जन्म होताच स्वर्गात युद्ध पेटते. मीखाएल (ज्या नावाचा अर्थ, “देवासारखा कोण आहे?”) या नावाने येशू लढत देऊन सैतान व त्याचे दुरात्मे यांजवर विजय मिळवितो व त्यांना पृथ्वीवर ढकलून देतो. (प्रकटीकरण १२:७-१२) येशूची ही विजयी दौड प्रभूच्या दिवसातील सुरवातीच्या दशकात चालूच राहते व याचवेळी पृथ्वीवरील मेंढरासमान लोकांना एकत्रित केले जात आहे. सबंध जग “त्या दुष्टाला वश झाले” असले तरी, येशू आपल्या अभिषिक्त भावांवर तसेच त्यांच्या सोबत्यांवर प्रेमळ देखरेख करीत असून तो त्या प्रत्येकाला विश्वासात विजयी बनण्यास मदत देत आहे.—१ योहान ५:१९.
पृ. ९२, परि. ९, शेवटले वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: या प्रत्येक देशात आता ६,००,००० पेक्षा अधिक साक्षीदार, कार्याचा अहवाल देत आहेत.—यशया ५४:१७; यिर्मया १:१७-१९.
पृ. ९४, परि. १८, परिच्छेद पुढीलप्रमाणे बदलावा: याला आम्ही लष्करी तंत्रज्ञानाचा विजय म्हणू शकतो का? त्याऐवजी त्या निर्दयी अग्निवर्ण घोड्याची दौड पुढे चालू आहे याची ती साक्ष आहे. ही दौड केव्हा संपेल? सुनियोजित आण्विक युद्धाच्या शक्यतेसोबतच, काही शास्त्रज्ञ अपघाती आण्विक युद्धाची शक्यता देखील वर्तवतात! पण याबद्दल पांढऱ्या घोड्यावरील विजयी स्वाराच्या मनात वेगळेच विचार आहेत हे आनंदाचे आहे.
पृ. ९७, परि. २८, परिच्छेद पुढीलप्रमाणे बदलावा: ‘प्राणघातक पीडा’ ही अलिकडे महत्त्वाची गोष्ट बनली आहे. पहिल्या जागतिक महायुद्धाचे बळी पडल्यावर, १९१८-१९ च्या काही महिन्यातच स्पॅनिश फ्ल्युने २ कोटी जिवांची कापणी केली. या आपत्तीपासून बचावलेला पृथ्वीवरील एकच प्रदेश होता व तो म्हणजे सेंट हेलेनाचे छोटे बेट. जेथे मोठ्या संख्येने लोक मेले तेथे मृतांचे ढीग करून त्यांच्या चिता जाळल्या गेल्या. आज तंबाखूच्या प्रदुषणामुळे कर्करोग व हृदयविकार असे भयंकर आजार जडत आहेत. “अत्यंत भयानक दशक” असे ज्याचे वर्णन करण्यात येते त्या १९८० च्या दशकात, बायबलने बेकायदेशीर मानलेले आचरण अनुसरल्यामुळे एडस्च्या पीडेने या ‘प्राणघातक पीडेत’ आपली भर टाकली. एका वृत्तानुसार सन २००० मध्ये, संयुक्त संस्थानांच्या प्रमुख शल्यचिकित्सकाने एड्सला “आजपर्यंत जगात आलेली सर्वात घातक साथ” म्हटले. त्यांनी सांगितले की सबंध जगात ५ कोटी २० लाख जणांना एचआयव्ही/एड्सची लागण झाली असून त्यांच्यापैकी २ कोटी जण दगावले आहेत. ज्यामुळे अशा प्रकारातील अनेक आजार संक्रमित होतात त्या जारकर्म व रक्ताचा गैरवापर याबद्दल देवाच्या वचनातील सुज्ञ सल्ला पाळल्यामुळे आज यापासून दूर राहता आले म्हणून यहोवाचे लोक किती धन्यवादित आहेत!—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; पडताळा १ करिंथकर ६:९-११.
अध्याय १८
पृ. १०६, परि. ७, परिच्छेद पुढीलप्रमाणे बदलावा: दुसऱ्या जागतिक महायुद्धाने क्रांतीची आणखी लाट आणली. आणि अजूनही लहान युद्धे व आंतरराष्ट्रीय दहशतवाद पृथ्वीला हादरवून सोडत आहे. दहशतवाद्यांच्या व मोठ्या प्रमाणावर नाश घडवून आणणारी शस्त्रे बाळगणाऱ्या राष्ट्रांच्या भयावह धमक्यांमुळे अनेक लोक विचारात पडले आहेत.
पृ. १०७, परि. ९, तिसरे वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: यानंतर जे अंधकाराचे दिवस आले ते येशूने त्याच्या उपस्थितीविषयी केलेल्या भविष्यवादातील पूर्णतेचा भाग नक्कीच होते ज्यामध्ये “पृथ्वीवर . . . राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील, भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील” या गोष्टींचा देखील ओघाओघाने समावेश होणार होता. (लूक २१:७-९, २५-३१)*
पृ. १०७, परि. ११, चौथे वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: जगभरात घोषित करण्यात आलेल्या या इशाऱ्यामुळे सैतानाच्या जागतिक व्यवस्थीकरणाला देवाच्या येणाऱ्या न्यायदंडाविषयी सूचित करण्यात आले आहे.*
अध्याय २०
पृ. १२३, परि. ११, चौथे वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: या लिखाणाच्या प्रसंगी, १२५ पेक्षा अधिक देशांत मेप्स यंत्रणेद्वारे भाषांतरीत मजकूर विशिष्ट मांडणीत रचण्याचे काम चालू असून, त्यामुळे त्यांचे टेहळणी बुरूज हे दर पंधरवड्याला निघणारे नियतकालिक १३० पेक्षा जास्त भाषांत एकाच वेळी प्रसिद्ध करण्यास मदत मिळाली आहे.
पृ. १२८, परि. ३०, शेवटले वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: एकंदर मानवजातीपैकी फार कमी लोक, अर्थात, शिक्का मारण्यात आलेल्या १,४४,००० पैकी जर कोणी अद्याप पृथ्वीवरील उरले असतील तर ते व त्यांच्यासमवेत दुसरी मेंढरे यांचा मोठा लोकसमुदाय, ‘टिकाव धरेल,’ म्हणजे बचावला जाईल.—पडताळा यिर्मया ३५:१९; १ करिंथकर १६:१३.
अध्याय २२
पृ. १४३, उपशीर्षक पुढीलप्रमाणे बदलावे: आजच्या काळातली टोळांची पीडा
पृ. १४६, परि. १६, प्रकटीकरण ९:१० या उद्धृत केलेल्या वचनानंतरची वाक्ये पुढीलप्रमाणे बदलावीत: याचा काय अर्थ होतो? राज्याचे प्रचार कार्य करीत असताना, यहोवाचे साक्षीदार आपल्या वाणीने व छापील प्रकाशनांच्या माध्यमाने देवाच्या वचनावर आधारित अधिकारयुक्त विधाने करतात. त्यांचा संदेश विंचवाच्या दंशासारखा आहे कारण ते यहोवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करतात. (यशया ६१:२) या आध्यात्मिक टोळांच्या सध्याच्या पीढीचे आयुष्यमान संपण्याआधीच त्यांचे यहोवाचे न्यायदंड घोषित करण्याचे ईश्वरनियुक्त कार्य पूर्ण होईल व ते सर्व ताठ मानेच्या निंदकांना मोठी इजा देईल.
पृ. १४७, परि. १७, तळटीप पुढीलप्रमाणे बदलावी: * या नियतकालिकाला १९३७ मध्ये काँसोलेशन आणि १९४६ मध्ये अवेक! असे नाव देण्यात आले.
अध्याय २४
पृ. १६०, परि. २१, ११ व्या ओळीत “शेरडासमान लोकांसाठी” याऐवजी: विरोध करणाऱ्यांसाठी असे घालावे
पृ. १६०, परि. २१, “मत्तय २५:३१-३४, ४१, ४६” याऐवजी फिलिप्पैकर १:२७, २८ असे घालावे
पृ. १६०, २१ (ब) हा प्रश्न पुढीलप्रमाणे बदलावा: ही सुवार्ता विरोध करणाऱ्यांसाठी वाईट वार्ता का आहे?
अध्याय २५
पृ. १६२, परि. ४, तळटीप पुढीलप्रमाणे बदलावी: * या आध्यात्मिक मंदिराच्या संपूर्ण चर्चेसाठी टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या जुलै १, १९९६ अंकातील “यहोवाचे महान आध्यात्मिक मंदिर” व डिसेंबर १, १९७२ (इंग्रजी) अंकातील “उपासना करण्याकरता असलेले एकच खरे मंदिर” हा लेख पहा.
पृ. १६२, परि. ५, तिसरे वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: इब्री शास्त्रवचनातील भविष्यवादात अशा या मोजमापाद्वारे ही हमी देण्यात आली की न्याय हा यहोवाच्या परिपूर्ण दर्जांना अनुसरुन दिला जाईल.
पृ. १६२, परि. ७, प्रकटीकरण ११:२ या उद्धृत केलेल्या शास्त्रवचनानंतरचे दुसरे वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: आपण पुढे पाहणारच आहोत त्याप्रमाणे, येथे असलेल्या खरोखरच्या ४२ महिन्यांचा संदर्भ खऱ्या महिन्यांना असून ती कालमर्यादा, ख्रिस्ती म्हणणाऱ्या सर्व ख्रिश्चनांची जी खडतर परीक्षा झाली त्या डिसेंबर १९१४ ते जून १९१८ च्या काळाला लागू होणारी आहे.
पृ. १६४, परि. १२, तिसरे वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: यासोबतच, प्रभुचा दिवस सुरु झाला तेव्हा साडे तीन वर्षे देवाच्या लोकांना कठीण काळ अनुभवण्यास मिळाला, हा अनुभव येथे भाकीत करण्यात आलेल्या घटनांशी जुळणारा होता—हा काळ डिसेंबर १९१४ मध्ये सुरु होऊन जून १९१८ पर्यंत चालला.
पृ. १६५, चित्राखालील मथळा पुढीलप्रमाणे बदलावा: यरुब्बाबेल व यहोशवा यांनी केलेल्या पुर्नउभारणीच्या कामाद्वारे सूचित केले की, प्रभूच्या दिवशी यहोवाच्या साक्षीदारांची सुरवात लहान असेल पण नंतर तिच्यामध्ये प्रचंड वाढ होईल. वर दाखवण्यात आलेली ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यंत्रणा, गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक वाढवावी लागली
पृ. १६५, परि. १५, “(मत्तय १७:१-३; २५:३१)” याऐवजी (मत्तय १७:१-३) असे घालावे
अध्याय २७
पृ. १८५, परि. २८, पहिली दोन वाक्ये पुढीलप्रमाणे बदलावीत: छळाचा हा निष्ठुर पूर दुसऱ्या जागतिक महायुद्धात उच्च स्तरावर गेला. युरोपात नात्सी छळ छावण्यात सुमारे १२ हजार साक्षीदारांना कैदेत टाकण्यात आले आणि जवळजवळ २,००० साक्षीदार यात मरण पावले.
अध्याय २८
पृ. १८७, परि. ४, तळटीप पुढीलप्रमाणे बदलावी: * याच्या सविस्तर माहितीसाठी कृपया “दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या” (इंग्रजी) या यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातील पृष्ठे १६५-७९ पाहावीत.
पृ. १९०, परि. १५, पहिली तीन वाक्ये पुढीलप्रमाणे बदलावीत: श्वापदाच्या त्या वर्चस्व गाजविणाऱ्या सातव्या डोक्याला ते युद्ध खूपच नाशकारक वाटले. इतर युरोपियन राष्ट्रांसोबत ब्रिटनने देखील आपल्या तरुणांना आघातजन्य संख्येने गमावले. बॅटल ऑफ रिवर सोमे या एकाच युद्धात, १९१६ मध्ये ४,२०,००० ब्रिटीशांसोबत, १,९४,००० फ्रेंच, ४,४०,००० जर्मन सैनिक मृत्यूमुखी पडले—म्हणजे १०,००,००० पेक्षाही अधिक जणांचा बळी!
पृ. १९२, परि. २२, १५ वी ओळ पुढीलप्रमाणे बदलावी: त्यांची ही परीक्षा, जून १९१८ मध्ये त्यांना ‘जिंकिले गेले’ तेव्हा कळसाला पोचली.
अध्याय २९
पृ. २०२, परि. १४, १-३ ओळी पुढीलप्रमाणे बदलाव्यात: ते १,४४,००० जण “पृथ्वीवरुन विकत घेतलेले,” “माणसातून विकत घेतलेले,” आहेत. त्यांना देवाचे पुत्र असे दत्तक घेतले जाते व मग,
अध्याय ३०
पृ. २०९, परि. १०, पहिले वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: अभिषिक्त ख्रिश्चनांनी १८७० च्या दशकापर्यंत, मोठ्या बाबेलीच्या वेश्या पद्धतीच्या मार्गातून स्वतःला दूर करण्याच्या निर्धाराचा प्रयत्न आरंभिला होता.
पृ. २०९, १० व्या क्रमांकाचा प्रश्न पुढीलप्रमाणे बदलावा: १८७० च्या दशकापर्यंत काय घडले होते आणि मोठ्या बाबेलने याबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवली?
पृ. २१२ वरील, परि. २३, पहिले वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: यानंतर, दुसरी मेंढरे यांच्या मोठ्या लोकसमुदायाची कापणी होते. (योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९)
अध्याय ३२
पृ. २३१, परि. २७, “मत्तय २४:४२, ४४” इथपासून सुरू होणाऱ्या परिच्छेदाच्या शेवटल्या भागात पुढीलप्रमाणे बदल करावा: (मत्तय २४:४२, ४४; लूक १२:३७, ४०) याच इशाऱ्याबद्दल प्रतिध्वनी उमटवून प्रेषित पौल म्हणाला: “जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा [यहोवा, NW] दिवस येतो. शांति आहे, निर्भय आहे, असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात् वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात् नाश होतो.” “शांति आहे, निर्भय आहे,” या आशयाच्या कोणत्याही घोषणेमागे सैतानच आहे!—१ थेस्सलनीकाकर ५:२, ३.
अध्याय ३३
पृ. २४३, परि. २१, शेवटल्या वाक्याच्या आधीच्या वाक्यात पुढीलप्रमाणे बदल करावा: या भाषणात पोपने येशू ख्रिस्त किंवा देवाच्या राज्याकडे अजिबात लक्ष वेधले नाही, हे लक्षणीय आहे.
अध्याय ३४
पृ. २४६, परि. १, शेवटल्या वाक्याच्या आधीचे वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: पण हे दृश्य आश्चर्यकारक रितीने आपल्या काळात वास्तवात उतरते.
पृ. २५०, परि. १२, तळटीपेत आलेल्या “१९८१” या वर्षाऐवजी १९९३ असे घालावे
पृ. २५१, परि. १४, परिच्छेद पुढीलप्रमाणे बदलावा: अलीकडील वर्षांत राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या मानवी योजनांचे वर्णन करण्याकरता ‘शांती व निर्भय’ ही अभिव्यक्ती उपयोगात आणली आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या अशा प्रयत्नांना १ थेस्सलनीकाकर ५:३ याची पूर्णता म्हणता येईल का? की पौल अतिशय नाट्यमयरित्या होणाऱ्या विशिष्ट घटनेविषयी भाकीत करत होता, अशी घटना जी सर्व जगाचे लक्ष वेधून घेईल? बायबलच्या भविष्यवाण्या सहसा त्या पूर्ण झाल्यावर किंवा पूर्ण होण्याच्या स्थितीत असताना पूर्णपणे स्पष्ट होतात; त्यामुळे या संदर्भातही आपल्याला काय घडते ते थांबून पाहावे लागेल. पण तोपर्यंत, ख्रिश्चनांना हे माहीत आहे की राष्ट्रांनी शांती व सुरक्षितता स्थापन केल्याचा कितीही आभास निर्माण केला तरीही मुळात काहीही बदललेले नसेल. स्वार्थीपणा, द्वेष, गुन्हे, कौटुंबिक अव्यवस्था, अनैतिकता, आजार, दुःख, व मृत्यू तेव्हा देखील असेल. त्यामुळे, जर तुम्ही जागतिक घटनांच्या अर्थाबाबत जागृत राहिला व देवाच्या वचनातील भविष्यदर्शक सूचना ऐकल्या तर “शांती आहे, निर्भय आहे” अशा घोषणेने तुमची फसवणूक होण्याची गरज नाही.—मार्क १३:३२-३७; लूक २१:३४-३६.
अध्याय ३६
पृ. २५९, परि. ४, शेवटली दोन वाक्ये पुढीलप्रमाणे बदलावीत: १९१४ मध्ये येशू स्वर्गीय राजा बनला आणि तेव्हापासून तो यहोवाचा सहराजा व न्यायाधीश म्हणून या पृथ्वीवर आपला अधिकार चालवत आहे. या कारणामुळे, मोठ्या बाबेलच्या पतनाबद्दल त्यानेच घोषणा करावी हे योग्य आहे.
पृ. २६५, परि. २२, शेवटले शास्त्रवचन गाळावे: पडताळा मत्तय २४:१५, १६.
पृ. २६६, परि. २८, तिसरे व चौथे वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: तिने जे दिले त्याच्या दुप्पट मोबदल्यात तिला परत मिळायचे आहे. मोठ्या बाबेलला दया दाखवली जाणार नाही, कारण तिने बळी घेतलेल्या लोकांबद्दल कसलीही दया दाखवली नव्हती.
अध्याय ३८
पृ. २७७, परि. १७, शेवटली दोन वाक्ये पुढीलप्रमाणे बदलावीत: आतापर्यंत जर पृथ्वीवर काही अभिषिक्त जन उरलेले असतील तर निश्चितच ख्रिस्ताने पूर्ण विजय मिळवल्यानंतर लवकरच, ते वधूवर्गाच्या त्यांच्या सहसदस्यांना जाऊन मिळण्यासाठी स्वर्गीय प्रतिफळ मिळवतील. मग, देवाच्या नियुक्त वेळी, कोकऱ्याचे लग्न संपन्न होईल!
पृ. २७७, परि. १८, पहिले वाक्य पुढीलप्रमाणे बदलावे: स्तोत्र ४५ यातील भविष्यसूचक अहवाल घटनाक्रमाचे वर्णन करतो.
अध्याय ३९
पृ. २८१, परि. १०, शेवटली दोन वाक्य पुढीलप्रमाणे बदलावीत: तसेच, येशू आपल्या वैभवी राजासनावर बसलेला असताना व पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे व लोकांचा न्याय करीत असताना ‘सर्व देवदूत’ त्याच्यासोबत असतील. (मत्तय २५:३१, ३२) निश्चितच, देवाच्या न्यायाची सरतेशेवटी पूर्ण अंमलबजावणी होईल तेव्हा त्या निर्णायक युद्धात येशू पुन्हा आपल्या देवदूतांसह असेल.
अध्याय ४१
पृ. २९६, परि. ५, पहिली तीन वाक्ये पुढीलप्रमाणे बदलावीत: जुने आकाश व जुनी पृथ्वी पळून गेल्यावर न्यायासाठी कोण बाकी उरले आहेत? १,४४,००० चे अभिषिक्त शेष तर मुळीच नाहीत, कारण त्यांचा न्याय पूर्वीच होऊन त्यांच्यावर शिक्कामोर्तबही झाला आहे. हर्मगिदोनानंतरही त्यांच्यापैकी काहीजण पृथ्वीवर अजून जिवंत असल्यास त्यांचा लवकरच मृत्यू होईल व पुनरुत्थानाकरवी त्यांना त्यांच्या स्वर्गीय जीवनाचे बक्षीस मिळेल. (१ पेत्र ४:१७; प्रकटीकरण ७:२-४)
अध्याय ४३
पृ. ३११, परि. १९, “प्रकटीकरण ११:१५; १२:१०” यानंतरची वाक्ये पुढीलप्रमाणे बदलावीत: शेवटल्या काळादरम्यान आत्मा व वधू यांनी योग्य मनोवृत्तीच्या लोकांना जीवनाचे पाणी फुकट घेण्याकरता आमंत्रित केले आहे. या नदीतले पाणी अशा योग्य मनोवृत्तीच्या लोकांना या जगाच्या अंतापर्यंत व त्यानंतर नव्या जगात जेव्हा नवी यरुशलेम ‘देवापासून स्वर्गातून उतरेल’ तेव्हासुद्धा उपलब्ध असेल.—प्रकटीकरण २१:२.
पृ. ३१२, परि. २६, पहिली दोन वाक्ये पुढीलप्रमाणे बदलावीत: नदीकडून उत्तम पाण्याचा पुरवठा मिळणाऱ्या त्या झाडांत कोकऱ्याच्या नवरीचे सदस्य असलेल्या १,४४,००० जणांचाही समावेश असू शकतो. पृथ्वीवर असताना हे सुद्धा येशू ख्रिस्तामार्फत जीवनासाठी देवाच्या तरतूदीतून पीत आहेत. लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, येशूच्या या आत्म्याने जन्मलेल्या बांधवांना भविष्यसूचकरित्या “धार्मिकतेचे वृक्ष” असे म्हटले आहे. (यशया ६१:१-३; प्रकटीकरण २१:६)